Pune News : सिम्बायोसिस कॉलेजच्या शिक्षकाला हिंदू देवतांवर बोलणं भोवलं! डेक्कन पोलिसांनी केलं अटक…

Pune News : हिंदु देवतांवर बोलणं सिम्बायोसिस कॉलेजच्या शिक्षकाला चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या शिक्षकावर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत असताना हिंदू-देवतांचा अवमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओच एका विद्यार्थ्याने शूट केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ समोर आल्यानंतर आरएसएस प्रणित अखिल […]

Teacher Suspended

Teacher Suspended

Pune News : हिंदु देवतांवर बोलणं सिम्बायोसिस कॉलेजच्या शिक्षकाला चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या शिक्षकावर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत असताना हिंदू-देवतांचा अवमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओच एका विद्यार्थ्याने शूट केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ समोर आल्यानंतर आरएसएस प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं.

सुवेंद्र गांधींना पकडून हजर करा; दिल्ली न्यायालयाचे आदेश

अशोक ढोले असं या शिक्षकाचं नाव असून ढोले सिम्बायोसिस महाविद्यालयात नोकरी करतात. विद्यार्थ्यांना शिकवताना अशोक ढोले यांनी हिंदु देवतांचा अवमान केल्याचा आरोप एबीव्हीपकडून करण्यात आलायं. ढोले यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर महाविद्यालय प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Delhi Ordinance Bill लोकसभेत मंजूर; विरोधकांचा सभात्याग, आपचा खासदार निलंबित

अशोक ढोले वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असताना एका विद्यार्थ्याने त्यांचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर विद्यार्थी संघटनेच्या काही सदस्यांनी व्हिडिओसंदर्भात महाविद्यालय प्रशासनाला संपर्क साधून माहिती दिली. तसेच संबंधित शिक्षकावर कारवाईची मागणी देखील केली. त्यानंतर आम्ही संबंधित शिक्षकाला निलंबित केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमण यांनी सांगितली आहे.

दरम्यान, या प्रकरणी शिक्षक अशोक ढोले यांच्यावर कलम 295 धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्हिव्ही हसबनीस यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version