सुवेंद्र गांधींना पकडून हजर करा; दिल्ली न्यायालयाचे आदेश

सुवेंद्र गांधींना पकडून हजर करा; दिल्ली न्यायालयाचे आदेश

Ahmednagar News : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी यांना एका खासगी प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने फरार घोषित केले आहे. सुवेंद्र गांधी यांना पकडून तीन दिवसांत न्यायालयात हजर करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हॉटेल व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना

दिल्लीतील गणपती ट्रेडर्सकडून 2011 साली सुवेंद्र गांधी यांनी 8 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे पैसे त्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे गणपती ट्रेडर्सने पैशाचा तगादा लावल्याने गांधी यांनी 18 कोटी 53 लाख रुपयांचे तीन धनादेश दिले होते.

Video : राजू शेट्टींनी माझे पंख छाटण्याचे प्रयत्न करु नयेत! तुपकरांचा नेतृत्वाला थेट इशारा

यात पहिला धनादेश वटला नाही. त्यामुळे संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणातील कोणत्याही सुनावणीला गांधी न्यायालयात हजर न झाल्याने न्यायालयाने गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटिसा पाठविल्या होत्या.

‘शिंदे, मी, अजितदादा, भुजबळ अन् विखे पाटील…’; पाच नेत्यांचा संदर्भ देत फडणवीसांच्या वडेट्टीवारांना शुभेच्छा!

नोटीसा पाठवूनही सुवेंद्र गांधी न्यायालयात हजर न झाल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले आहे. तसेच त्यांना पकडून हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, न्यायालयाने हा आदेश 1 ऑगस्ट रोजी काढला आहे. गांधी यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई होणार असल्याची चर्चा नगर शहरात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube