Download App

पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुखांच्या वाहनावर गोळीबार; निलेश घारे थोडक्यात बचावले…

शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना पुण्यातील गणपती माथा परिसरात घडलीयं.

Nilesh Ghare : पुणे शहरातील गणपती माथा परिसरात रविवारी (ता.18 मे ) संध्याकाळच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे (Nilesh Ghare) यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

मी शाहरुखसारखा स्टारडम… दाऊदच्या पैशांचा इंडस्ट्रीत वापर, अनु अग्रवाल यांनी केले धक्कादायक खुलासे

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश घारे हे गणपती माथा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. यादरम्यान कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या चारचाकी गाडीवर दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसर सील करून फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले आहे. गाडीवर किती गोळ्या झाडल्या? कोणत्या प्रकारच्या बंदुकीचा वापर करण्यात आला? याचा तपास सुरु असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

बंटी पाटील-मुश्रीफ की शिंदे-फडणवीस कोण ठरणार सरस? महाडिकांची चाल अन् गोकुळमध्ये ट्विस्ट

दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निलेश घारे यांचा राजकीय वावर, त्यांचे कुणाशी वाद आहे का? तसेच कुणाशी वाद झाला का? यांची माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घारे स्थानिक राजकारणात सक्रिय झाले होते. त्यामुळे हे राजकीय सूडाचे स्वरूप असू शकते, अशी अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गणपती माथा परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीती असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे. पुढे तपासात काय उघड होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us