मी शाहरुखसारखा स्टारडम… दाऊदच्या पैशांचा इंडस्ट्रीत वापर, अनु अग्रवाल यांनी केले धक्कादायक खुलासे

मी शाहरुखसारखा स्टारडम… दाऊदच्या पैशांचा इंडस्ट्रीत वापर, अनु अग्रवाल यांनी केले धक्कादायक खुलासे

Anu Aggarwal Statement on Bollywood Dawood Ibrahim Shahrukh Khan : ‘आशिकी’ (Aashiqui) चित्रपटातून स्टार बनलेली अभिनेत्री अनु अग्रवाल गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. अलीकडेच बॉलिवूडच्या (Bollywood) बदलत्या काळाबद्दल बोलताना त्यांनी एक मोठा खुलासा केलाय, खरं तरं लोकं अशा गोष्टी लपवून ठेवणे पसंत करतात. खरं तर अनुने (Anu Aggarwal) 90 च्या दशकाची आठवण करून देताना म्हटलंय की, त्यावेळी दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) दबदबा होता. चित्रपटांमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा वापरला जात असे.

पिंकव्हिलाशी बोलताना अभिनेत्री अनु अग्रवालने म्हटलंय की, हा एक घाणेरडा व्यवसाय होता. 90 च्या दशकात बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचा प्रभाव होता. अनेक चित्रपटांना त्यांच्याकडून निधी मिळत असे. त्यावेळी हा सर्व व्यवहार टेबलाखाली होता. त्यावर दाऊद इब्राहिम सारख्या लोकांनी राज्य केले. चित्रपट उद्योगात येणारा सर्व पैसा अंडरवर्ल्डमधून आला. शाहरुखसारखे (Shahrukh Khan) स्टारडम मिळाले, असं देखील अनु अग्रवाल यांनी म्हटलंय.

बीडच्या गुन्हेगारीवर सुरेश धसांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, बिंदूनामावलीचाही मुद्दा मांडणार, पोलिसांवरही संशय

अनु अग्रवालने आशिकी चित्रपटातून पदार्पण करून एका रात्रीत प्रसिद्धी मिळवली होती, लोक तिची एक झलक पाहण्यासाठी तिच्याबद्दल वेडे होते. त्या काळातील त्यांच्या स्टारडमची आठवण करून देताना अनु यांनी म्हटलंय की, त्यावेळी, एकटे फिरणे आणि एकटे राहणे माझ्यासाठी खूप कठीण होते. माझ्या इमारतीखाली चाहत्यांची गर्दी असायची. मी जिथे राहत होते, तिथे आमदार-खासदारांची इमारत होती, त्यामुळे आम्हाला पोलिस संरक्षण होते.

टेन्शन वाढलं! भारतात कोरोना पुन्हा येणार… आरोग्य तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती

माझी इमारत पाहण्यासाठी लोक वेगवेगळ्या देशांमधून येत असत, जसे आज लोक शाहरुख खानबद्दल वेडे आहेत. शाहरुख माझा शेजारी आहे. माझ्यासोबतही असेच व्हायचे. प्रसिद्ध होण्याचा हा काळ माझ्यासाठी आनंदोत्सवापेक्षा जास्त गुदमरणारा होता. मला अजून माझी पूर्ण फी मिळालेली नाही, असा मोठा खुलासा देखील अनुने केला आहे. एकूण फीच्या फक्त 60 % रक्कम देण्यात आली आहे. त्यांना अजूनही माझे 40 % द्यावे लागतील. उर्वरित पैसे वसूल करण्यासाठी मी कधीही चित्रपट निर्मात्यांशी संपर्क साधला नाही. अभिनेत्री म्हणाली, काही हरकत नाही, मी खूप कमाई केली. मी मॉडेलिंगमधून खूप कमाई केली. मी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube