Download App

पुणेकरांसाठी गुड न्यूज; आता मध्यरात्री करता येणार पीएमपीने प्रवास

Pune PMP :  पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये पीएमपीची रातराणी सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशीरा कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवशांना दिलासा मिळाला आहे. याआधीदेखील ही सेवा सुरु होती. पण काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने रातराणीची सेवा बंद केली. त्यामुळे रात्री उशीरा कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांची अडचण होत होती. त्यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे ही सेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. आता अखेर त्यांची ही मागणी पूर्ण झाली आहे.

सर्वसामान्यांना दिलासा! कर्जाचे हप्ते वाढणार नाहीत, RBI कडून रेपो रेट ‘जैसे थे’

पीएमपी प्रशासनाने आजपासून ( 8 जून ) ही रातराणीची सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. पीएमपी प्रशासनाने ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळतो त्या मार्गावर ही सेवा कमी केली होती तर काहीठिकाणी पूर्णपणे या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यातच 4 महिन्यांपूर्वी रातराणीची सेवा बंद करण्यात आल्याने रात्री उशीरा कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षा अथवा अन्य वाहनातून घरी जावे लागत होते. हा खर्च प्रवाशांना परवडणारा नव्हता. आता ही सेवा पुन्हा सुरु करण्यात येत आहे.

Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…

ही सेवा सुरुवातीला फक्त पाच मार्गावर सुरु करण्यात येत आहे. याठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला तर अन्य मार्गांवरदेखील ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.

या मार्गांवर ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. 

1.कात्रज ते शिवाजीनगर ( नवीन एसटी स्थानक ) व्हाया स्वारगेट, शनिपार, मनपा भवन
2.कात्रज ते पुणे स्टेशन व्हाया स्वारगेट, नानापेठ, रास्ता पेठ
3. हडपसर ते स्वारगेट व्हाया वैदुवाडी, रामटेकडी, पुलगेट
4. हडपसर ते पुणे स्टेशन व्हाया पुलगेट, बॉम्बे गॅरेज, वेस्टएंड टॉकीज
5. पुणे स्टेशन ते एनडीए गेट 10 व्हाया नाना पेठ, लक्ष्मी रस्ता, डेक्कन कॉर्नर

Tags

follow us