Download App

मोदींच्या नावाने तोतया अधिकाऱ्याची दंबगगिरी; पुणे पोलिसांना आवळल्या मुसक्या

Pune Fraud IAS Officer Arrest :  पंतप्रधान कार्यालयात सीक्रेट आयएएस अधिकारी असल्याचे भासवून मोठमोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला पोलिसांना ताब्यात घेतले आहे.  दिनांक 29/05/2023 राेजी सकाळी 08/30 वा ते 09/30 वा चे दरम्यान बंगला नं.351, सिंध हाैसिंग साेसायटी, औंध पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठवीण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. सदर कार्यक्रमाचे वेळी विरेन शहा , सुहास कदम, पी के गुप्ता व इतर ट्रस्टी व सदस्य असे हजर हाेते.

सदर कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणुन आलेले एक इसम ज्यांनी आपले नाव डाॅ. विनय देव असे सांगितले असून ते स्वत: आय. ए. एस. यापदावर असून सध्या त्यांची ड्युटी सेक्राेटरी या पदावर पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे असून ते गाेपनीय काम करीत असतात असे सांगितले. सदर माहितीबाबत त्यांचेकडे संस्थेचे पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली असता त्यांच्या आय.ए. एस पदाबाबत त्यांना संशय वाटला.

Rohit Pawar यांच्याकडून मध्यरात्रीच अहिल्यादेवींची जयंती साजरी; राम शिंदे म्हणाले, प्रथा, परंपरा…

अशी माहिती प्राप्त झाल्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे  दिनांक 30/05/2023 राेजी डॉक्टर विनय देव याचा शोध घेतला असता  त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने त्याचे नाव वासुदेव निवृत्ती तायडे वय 54 वर्ष रा प्लाॅट नं.336 , रानवारा राे हाऊस तेळेगाव दाभाडे, पुणे. असे असल्याचे सांगितले. यास 15/45 वा रहाते घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यास विश्वासात घेवून अधिक चाैकशी करता त्याने आपले खरे नाव लपवून आपले नाव डाॅ. विनय देव असे सांगून स्वत: आय ए एस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे डेप्युटी सेक्रेटरी म्हणुन नाेकरीस असल्याचे लाेकांना सांगून लाेकांमध्ये वावरत असल्याचे सांगितल्याने त्याचे विरूध्द सपाेफाै मखरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भादवि कलम 419,170 अन्वये चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांच्या मनात 2 नावे! अमोल कोल्हे आणि….

सदरची कामगिरी मा. रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, मा. अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर, मा. सुनील पवार सहाय्यक पोलीस आयुक्त सो गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 1 गुन्हे शाखेकडील वपाेनिरी शब्बीर सय्यद, सपाेनिरी कवठेकर, पाेलीस अंमलदार राहुल मखरे, इम्रान शेख, अभिनव लडकत व निलेश साबळे यांच्या पथकाने केली आहे.

Tags

follow us