Download App

राजेंद्र लांडगे अजूनही फरारच; 10 एकर हडपण्यासाठी PI ने घेतले 4 कोटी 50 लाख…

पुण्यातील वाघोली परिसरातील 10 एकर जमीन हडपण्यासाठी अपर्णा वर्मा यांच्याकडून पीआय राजेंद्र लांडगे यांनी 4.5 कोटी रुपये घेतल्याचं समोर आलंय.

Pune Land Scam : वाघोली परिसरातील 10 जागा हडपण्यासाठी पीआय राजेंद्र लांडगे (Rajendra Landge) यांनी संबंधित महिला अपर्णा वर्मा यांच्याकडून 4 कोटी 50 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आलीयं. वर्मा यांनी या जमिनीसाठी आत्तापर्यंत 7 कोटी रुपये राजेंद्र लांडगेंच्या टोळीला दिल्याचे जबाबात सांगितलं आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

अकार्यक्षम महिलेला अध्यक्षपद कोणत्या निकषावर? सुषमा अंधारेंकडून चाकणकरांवर टीकास्त्र अन् ठोंबरेंचं कौतुक

अपर्णा वर्मा नावाच्या दुबई येथे राहणाऱ्या महिलेच्या नावावर असून त्याची रेडीरेकनरनुसार किंमत तब्बल १०० कोटी रुपये आहे, तर बाजारमूल्य संबंधित किमतीच्या दुप्पट आहे. सदर जागा हडप करण्यासाठी तत्कालीन चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी त्यांचा मेहुणा व साथीदारासह अपर्णा वर्मा नावाच्या महिलेच्या जागी अर्चना पटेकर नावाची महिला उभी करून तीच अर्पणा वर्मा असल्याचे भासवून तिची बनावट कागदपत्रे काढली. या प्रकरणात दुबई येथून पुणे, मुंबईत वारंवार केसेसला न्यायालयात येणे शक्य नसल्याचा गैरफायदा घेत पोलिस निरीक्षक लांडगे यांच्या टोळीने तब्बल ७ कोटी रुपये स्वीकारले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

एवढंच नाही तर वर्मा यांच्याकडून आणखी 11 कोटी रुपयांची मागणी करत दुसराच एक व्यक्ती या जागेवर खरेदीदार म्हणून उभा करत ब्लॅकमेलिंग करण्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे हे पसार झाला असून त्याचा शोध पोलिस पथके घेत आहेत.

कुलमीत भार्गवचं पदार्पण अन् जॉश बरारचं Heart & Pain; खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अपर्णा वर्मा यांनी कोणाला किती पैसे दिले?
तडजोडीसाठी अपर्णा वर्मा यांनी आनंद भगत नामक व्यक्तीस 50 लाख रुपयेत तर अर्चना पटेकर हिला 50 लाख रुपये, राजेंद्र लांडगे याचा मेव्हणा शैलेश ठोंबर याला दीड लाख रुपये आणि राजेंद्र लांडगे याला साडेचार कोटी रुपये दिले आहेत.

या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून एका गुन्ह्यात अपर्णा वर्मा यांचा तक्रार अर्ज, २०२३ मध्ये आनंद भगत याच्या सन २०२३ मधील तक्रारीवरून दाखल झालेला बनावट फसवणुकीचा गुन्हा, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर यांची बनावट सही केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

तत्कालीन API खांडेकरांच्या बनावट सहीने गुन्हा…
या जागेवरुन वाद सुरु असतानाच राजेंद्र लांगडे याने तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धनाक खांडेकर यांच्या बनावट सहीने ते रजेवर असताना अपर्णा वर्मा यांच्याविरोधात गुन्ह्यातील आरोपी आनंद भगतच्या नावाने फिर्याद दाखल करुन कार्यालयीन टिपणीवर बनावट स्वाक्षरी करत येरवडा सहायक पोलिस आयुक्त व पोलिस उपायुक्त परिमंडळ चार यांच्या परवानगीने बोगस गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा खांडेकर यांनी केलायं.

follow us

संबंधित बातम्या