कुलमीत भार्गवचं पदार्पण अन् जॉश बरारचं Heart & Pain; खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

कुलमीत भार्गवचं पदार्पण अन्  जॉश बरारचं Heart & Pain; खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Kulmeet Bhargava’s debut and Josh Brar’s Heart & Pain; special song to be presented to the audience : टी-सिरीजने एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. हार्ट अॅन्ड पेन असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं प्रसिद्ध संगीतकार जॉश बरार यांनी लिहिलं आणि संगीतबद्ध केलं आहे. हे गाणं टॉप म्यूज़िक पब्लिकेशन ने Future of Music Artists 2025 मध्ये समाविष्ट केलं आहे.

राकेश ओला यांची बदली, सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे एसपी; 21 अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी पाहा

या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून कुलमीत भार्गवचं पदार्पण करणार आहे. या गाण्याची सुरूवात एका हार्ड-हिटिंग पॉप बीटसह होते. तर त्यानंतर थेट कव्वाली फॉर्ममध्ये हे गाणं ऐकायला मिळत. यामध्ये प्रेमभंगावर आधारित आहे. जॉशचा आवाज प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. या गाण्यामध्ये पॉप आणि कव्वाली या दोन गाण्याच्या फॉर्मचा मिलाप अत्यंत जबरदस्त पद्धतीने मांडण्यात आला आहे.

वेळ अन् पद्धत आमचं सैन्य ठरवणार! PM मोदींचा पाकिस्तानला उघड इशारा, दहशतवादाविरोधात भारताची त्रिसूत्री

अगम मान आणि असीम मान यांनी दिग्दर्शित केलेला आणि बंटी बॅंसयांच्याकडून निर्मित, म्युझिक व्हिडीओ म्हणजे एक कल्पना देखील भासते. तर सत्य असणारी सात जन्माचं नातं असणारी एक प्रेमकथा देखील भासते. या व्हिडीओचे व्हिज्युअल्स अत्यंत खोलवर मनाला भिडतात.

आधी बिश्नोई गॅंगकडून धमकी, आता सलमान खानच्या इमारतीत घुसखोरी, संशयीताला घेतले ताब्यात…

यावर बोलताना जॉश बरार म्हणाला की, “Heart & Pain हे गाणं मी 2023 लिहिलं होतं. आजही हे गाणं माझ्या मनाला अत्यंत भेदून जातं.तर गाण्याला संगीत देताना मी दोन अत्यंत वेगळ्या संगीत फॉर्मला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. मला यातून एक प्रभावी गाणं तयार करायचं होतं. त्यामुळे मी आशा करतो की, हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला भावेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube