Pune Police Press on Rave Party : पुण्यामधून खळबळनक बातमी समोर आली आहे. (Police) राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. पुणे पोलिसांनी मध्यरात्री पुण्यातल्या खराडी भागामध्ये एका फ्लॅटवर छापा टाकून सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या पार्टीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडण्यात आलं आहे, त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती, याची माहिती पोलिसांना मिळाली, मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला. समोर आलेल्या माहितीनुसार दोन महिलांसह पाच पुरुष या रेव्ह पार्टीमध्ये सहभागी होते. रेव्ह पार्टीमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिनी दिली. रेव्हा पार्टीमधून ज्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पोलिसांना घटनास्थळी हुक्का, दारू अंमली पदार्थ सापडल्याची माहिती आहे.
रेव्ह पार्टीत अडकलेले खडसेंचे दुसरे जावई प्रांजल खेवलकर कोण आहेत ?
यानंतर आता पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणात सुरू असलेल्या तपासाबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. या प्रकरणात निश्चितपणे काही कारवाया सुरू आहेत. त्या कारवायाच्या अंती जे तपासात निष्पन्न होईल, त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल. न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये इतर बाबी ज्या उघडकीस येतील त्या वेळोवेळी आपल्याला कळवण्यात येतील. या प्रकरणात काही गोष्टी निदर्शनास आल्या आहेत, आणि त्याबाबत आदल्या दिवशी तिथे काय झालं? तीथे अजून कोणी येणार होतं का? याबाबत तपास सुरू आहे असं ते म्हणाले.
या घटनेचा पुढील तपास झाल्यानंतरच माध्यमांना प्रकरणाबाबत खात्रीशीर माहिती देण्यात येईल. सगळ्या गोष्टी या तपासानंतर तुम्हाला कळवण्यात येतील. कुठलीही गोष्ट आधांतरी सांगण्यात येणार नाही. छापेमारीत ताब्यात घेतलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलं आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती देण्यात येईल, रेव्ह पार्टीसंदर्भात पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती यावेळी पुणे पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे.