Download App

पोलीस भरती जीवावर बेतली, संगमनेरमधील युवक धावतांना कोसळला, अन्…

धावण्याची चाचणी पूर्ण करत असताना एक तरुण अचानक खाली कोसळल्याने दगावला. तुषार बबन भालके (वय २७ वर्षे) असं दगावलेल्या तरुणाचे नाव आहे. बातमी अपडेट होत आहे.

Pune Police Recruitment : राज्यात सुमारे 17 हजार पदांसाठी पोलीस भरती (Police Recruitment ) सुरू आहे. या पोलीस भरतीदरम्यान अनेक उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागते असते. असाच काहीसा प्रकार पुणे पोलीस दलाच्या भरतीप्रक्रियेमध्ये घडला. धावण्याची चाचणी पूर्ण करत असताना एक तरुण अचानक खाली कोसळल्याने दगावला. तुषार बबन भालके (Tushar Baban Bhalke) (वय २७ वर्षे) असं दगावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सागरिका म्युझिकची यशस्वी 25 वर्ष पूर्ण’; ‘नानाछंद’ द्वारे सादर करणार नाना पाटेकरांमधील गीतकार 

तुषार हा (वय 27 वर्षे) अहमनगर जिल्ह्यातील कोठे बुद्रुक (ता. संगमनेर) गावचा रहिवाशी आहे. तुषार हा पुणे शहर दलाच्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. दरम्यान धावत असतांना तुषारला चक्कर आली होती. त्याला चक्कर आल्यानंर ससूनच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून पोलीस भरतीत धावताना दगावलेल्या तुषारच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कसळला आहे. पुणे येथील शिवाजी नगर पोलीस ग्राऊंडवर ही पोलीस भरती सुरू आहे.

Advani Health Updates: अडवाणींना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर, घरीच आराम… 

दरम्यन, पोलीस भरतीदरम्यान तरुणांचा दुर्दैवी अंत होण्याची राज्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मुंबईत एसआरपीएफ भरतीमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आज पुण्यात ही तिसरी घटना घडली. तुषार भालके (२७) असे मृत तरुणाचे नाव असून तो संगमनेर तालुक्यातील कोठे गावचा रहिवासी होता.

follow us