Pune Police Target Marane Gang! Marane Gang Sharp Shooter Bansode Arrested at Midnight : गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये पुन्हा एकदा गॅंगवॉर पाहायला मिळत आहे. त्यात आता पुणे पोलिसांनी मारणे गॅंगला टार्गेट केलं आहे. यामध्ये कोथरूड पोलिसांनी गजा मारणे टोळीतील गुख्यात गुंड सुनील बनसोडेला मध्यरात्री वारजे माळवाडी परिसरातून ताब्यात घेतलं. गेल्या अनेक दिवसांपासून बनसोडे फरार होता. मात्र आता त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा; हृता दुर्गुळे-सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र
पुण्यातील कोंढवा येवलेवाडी भागात शनिवारी दुपारी पेट्रोल पंपाजवळ झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती. रिक्षाचालक गणेश काळे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर बाजीराव रस्ता येथे देखील माया टोळीने एका तरूणाची कोयत्याने हत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे पुण्यातील कायदा आणि सुवव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राहुरीचा रिमोट कंट्रोल आता सुजय विखे यांच्या हातीच; अक्षय कर्डिलेंना बळ देणार?
मात्रा आता पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात त्यांनी गजा मारणे टोळीतील गुख्यात गुंड आणि शार्प शूटर म्हणून ओळख असलेला सुनील बनसोडेला मध्यरात्री वारजे माळवाडी परिसरातून ताब्यात घेतलं. बनसोडे याच्या विरोधात मोक्कासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बनसोडे फरार होता. मात्र आता त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत त्याला ताब्यात घेतलं. हे पुणे पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे. तसेच हा पुण्यातील गॅंगवॉरसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पुण्यातील गॅंगवॉर थांबेना…
आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाला गोळ्या झाडून संपविल्याचा प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला नाना पेठेतील टोळीयुद्धात 19 वर्षीय आयुष कोमकरची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता. त्यानंतर आता आयुषच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या दत्ता काळेचा भाऊ गणेश काळेवर कोंढव्यात गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
