Pune Police : पुणे शहरात 25 ऑगस्ट रोजी एक धक्कादायक घटना घडली होती. भाडणं सोडवण्यासाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकावर एका तरुणांकडून कोयत्यानं हल्ला करण्यात आला होता. या हल्लात सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड (Ratnadeep Gaikwad) जखमी झाले होते. यातच आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार सहायक पोलीस निरीक्षकावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अवघ्या 12 तासाच्या आत पुणे पोलिसांनी अटक केली आहे. निहालसिंग टाक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रकरण काय?
रामटेकडी (Ramtekdi) परिसरात भांडण सुरु होते ते भाडणं सोडवण्यासाठी आणि एकाला अटक करण्यासाठी पोलीस तिकडे गेले होते मात्र त्यावेळी निहाल सिंग टाक याने वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाला होता. निहाल सिंग टाक याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहे.
बांगलादेशकडून पराभव अन् पाकिस्तानला ICC ने दिला मोठा धक्का, जाणून घ्या नेमकं प्रकरण
या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लक्ष घालून आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकं निहालसिंग याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. अखेर रात्री उशिरा आरोपी निहालसिंग टाक त्याला पुणे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.