Download App

पुण्यात भाजपाला मोठा धक्का! भाजप प्रदेश पदाधिकारी सचिन फोलानेंचा शरद पवार गटात प्रवेश

भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेश पदाधिकारी सचिन फोलाने यांनी कमळाची साएथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसस शरदचंद्र पवार पक्षात गेले

  • Written By: Last Updated:

Sachin Folane Join Sharad Pawar Group : ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhansabha Election) पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेश पदाधिकारी सचिन फोलाने यांनी कमळाची साथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केला.  त्यामुळे पुण्यात शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. सचिन फोलाने (Sachin Folane) हे खासदार मेधा कुलकर्णी यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा पाय खोलात, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल! 

सचिन फोलाने हे भाजपमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. त्यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांत मोठे योगदान दिले आहे. सचिन फोलाने यांनी अनेक वर्षे भाजपमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले असून, भाजप पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवून काम केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकहितवादी विचारांशी प्रेरित होत आणि शरद पवार गटाच्या विचारधारेशी एकरूप होत त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सरकार तिन्ही गॅझेट लागू करणार का?, शिंदे समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर जरांगेंचा सवाल 

पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी जयंत पाटील यांनी फोलाने यांचे स्वागत करतांना सांगितलं की, सचिन फोलाने यांच्या पक्षप्रवेशामुळं कोथरूडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत होईल. त्यांच्या अनुभवाचा आणि कर्तृत्वाचा पक्षाला फायदा होईल. आजच्या राजकीय परिस्थितीत युवकांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे असून फोलाने यांच्या नेतृत्वाचा पक्षाला फायदा होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी केला आहे.

यावेळी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उपाध्यक्ष संदीप बालवडकर यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, कोथरूड विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या जागेवरून उमेदवारी देण्यात आली होती. सध्या चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी स्वपक्षातून जोरदार विरोध आहे. शिवाय हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी शरद पवार गटानेही जोरदार फिल्डींग लावली आहे. त्याचाच भाग म्हणून फोलाने यांना पक्ष प्रवेश देण्यात आला.

 

follow us