Download App

Pune Porsche Accident Case प्रकरणी दोषारोपपत्र दाखल; सात आरोपी, साक्षीदारांची संख्याही मोठी पण…

तब्बल नऊशे पानांचे दोषारोपपत्र असून, त्यात सात जणांना आरोपी करण्यात आले आहेत. साक्षीदारांची संख्याही मोठी असून, 50 साक्षीदारांची यादी आहे.

  • Written By: Last Updated:

Pune Porsche Accident Case: पुण्यातील कल्याणीनगर भागातील (Pune Porsche Accident) पोर्शे कार अपघातप्रकरणी काही तपास पूर्ण झालाय. आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. तब्बल नऊशे पानांचे दोषारोपपत्र असून, त्यात सात जणांना आरोपी करण्यात आले आहेत. साक्षीदारांची संख्याही मोठी असून, 50 साक्षीदारांची यादी आहे. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात प्राथमिक दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पोर्शे कार

परंतु या गुन्ह्याचा काही तपास अद्याप अपूर्ण आहेत. आरोपींविरुद्ध प्राथमिक दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील डीएनए आणि इतर काही अहवाल मिळणे बाकी आहे. ते अहवाल आल्यानंतर पुरवणी दोषारोपपत्र सोबत न्यायालयात दाखल करण्यात येईल, असे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले आहे.

कोण-कोण आरोपी ?

या गुन्ह्यातील आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याची सुटका झालेली आहे. तर त्याचे वडिल विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (Vishal Agarwal) (वय ५०), आई शिवानी अग्रवाल यांच्यासह ससूनमधील डॉक्टर डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, रिपोर्ट बदलण्यासाठी मदत करणारे अश्पाक बाशा मकानदार, अतुल घटकांबळे हे आरोपी असून, त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र आहेत. तर अपघाताचे, अल्पवयीन मुलाने मद्य सेवन केलेले व्हिडिओ फुटेज, टेक्निकल पुरावे व इतर अहवाल हे पुरावे आहेत.

सोने पुन्हा उसळी घेणार; किमत सत्तर हजारीपार जाणार? जाणून घ्या तज्ज्ञाचं मतं


काय घडलंय ?

१९ मे च्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चालविलेल्या पोर्शे कारच्या धडकेत आयटी अभियंता अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी विशाल अग्रवालच्या मुलास ताब्यात घेण्यात आले. परंतु या प्रकरणी दुसऱ्या व्यक्तीविरोधात ड्रायव्हर दाखवून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु शेवटी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मुलाला निबंध लिहून सोडले

अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तीनशे शब्दाचा निंबध लिहिण्यास सांगत मुलाची सुटका करण्यास सांगितले. परंतु या प्रकरणात जनआक्रोश झाल्यानंतर मुलाला पुन्हा बालगृहात ठेवण्यात आले. पण हायकोर्टाच्या आदेशामुळे मुलाला जामिन देण्यात आलाय.

follow us