सोने पुन्हा उसळी घेणार; किमत सत्तर हजारीपार जाणार? जाणून घ्या तज्ज्ञाचं मतं
Gold Price Today : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प 2024-25 मध्ये सोने आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर आणि अमेरिकेच्या निवडणुकीपूर्वी आंतरराष्ट्रीय किमतींवर दबाव आल्याने भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये लक्षणीय घसरण दिसून येत आहे.
माहितीनुसार, भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये 4 हजार रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्यामुळे सध्या बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यातच जर तुम्ही देखील सोन्यामध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी योग्य ठरू शकते. याचा मुख्य कारण म्हणजे सराफा तज्ञांनी गुंतवणूकदारांना सध्या सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे तसेच सोने 72 हजार पर्यंत पोहोचल्यानंतर विक्री करण्याचा सल्ला दिला आहे.
LKP सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी यांनी भारतीय सराफ बाजाराची परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांना सोने खरेदीचा सल्ला दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, सध्या सोन्याच्या किमती 75 हजारांवरून 70 हजारांपेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे सोने खरेदीची बाजारात एक उत्तम संधी आहे. तर दुसरीकडे कॉमेक्स सोन्याने पहिल्यांदा $2,500 पोहोचले आहे. ही घसरण रुपयांच्या दृष्टीने एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे भारतीय बाजारात देखील सोने 4,200 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करणे योग्य असेल असं जतीन त्रिवेदी म्हणाले.
याच बरोबर यूएस फेडरल रिझर्व्ह बँक 30-31 जुलै रोजी त्याच्या व्याजदरांचे रिव्यू करणार आहे आणि जर बँकेने व्याजदरात कोणतीही कपात केली तर पुन्हा एकदा भारतीय सराफ बाजारात सोने स्वस्त होऊ शकते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची आणखी संधी वाढेल असं देखील जतीन त्रिवेदी म्हणाले.
आजचे सोन्याचे दर
आज भारतीय सराफ बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 68,110 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये सोने 72,890 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर भारतीय सराफ बाजारात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,800 रुपये आहे. तर भारतीय सराफ बाजारात आज चांदी 81,620 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
शिंदे गट उच्च न्यायालयात, ‘त्या’ प्रकरणात ठाकरे गटाविरोधात याचिका दाखल
तर मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 62,324 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 67,990 रुपये आहे. (किंमत प्रति 10 ग्रॅम) आणि पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत62,324 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 67,990 रुपये आहे.