Download App

‘मी माझ्या पद्धतीने सरकारला…’, शरद पवारांनी प्रवीण गायकवाडांना काय सांगितलं?

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवारांची पुण्यातील निसर्ग कार्यालयात भेट घेतली.

  • Written By: Last Updated:

Pravin Gaikwad met Sharad Pawar : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना (Pravin Gaikwad) अक्कलकोटमध्ये काळ फासल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) नेते शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. पुण्यातील निसर्ग कार्यालयात त्यांनी ही भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी पवारांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो, असं सांगितल्याचं गायकवाड म्हणाले.

जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी समिती; GR निघाला, 15 दिवसांत अहवाल येणार 

काय म्हणाले  गायकवाड?
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की, रविवारी जी घटना घडली, ती घडल्यापासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मला सातत्याने फोन करत आहेत. माहिती घेत आहे. शरद पवार साहेबांनी अनेक कॉल केले होते. सध्याची परिस्थिती योग्य नाही, काळजी घे, असं सांगितलं होतं. दोन ते तीन वेळा साहेबांनी फोन केला होता. आज मी पुण्यात साहेबांची भेट घेऊन घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. माझा जो संशय आहे की, मला मारण्याचा कट आहे, तो देखील सांगितला, असं गायकवाड म्हणाले.

‘सितारे जमीन पर’च्या स्पेशल शोला उपमुख्यमंत्री शिंदेंनी लागली हजेरी, आमिर खानचे केले कौतुक 

काटे बावनकुळे यांना गॉडफादर मानतात
पुढं गायकवाड म्हणाले की, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना दीपक काटे त्यांच्यासोबत असायचे. काटे हे मंत्री बावनकुळे यांना गॉडफादर मानतात. गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, अशी माझी अपेक्षा असल्याचंही मी पवारांना सांगितलं.

तसेच सध्याची परिस्थिती पाहता अनेकांवर असे निशाणे साधले जाऊ शकतात,असं मी शरद पवारांना सांगितल्याचंही गायकवाड म्हणाले.

तर मी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संपूर्ण प्रकरणाची मी माहिती घेत आहे. माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो, असं पवारांनी सांगितल्याचं गायकवाड म्हणाले.

दरम्यान, प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवधर्म संघटनेचे आणि भाजपचे पदाधिकारी दीपक काटे, भवनेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us