Pune Rain : पुणे शहरात आज दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून यामुळे नागरिकांची मोठी पंचायत होत आहे. पाषाण, बाणेर, औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड या भागात मुसळधार पाऊस होत आहे तर वारजे माळवाडी, कोथरुड, घोरपडी, लोहगावसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्याच बरोबर सिंहगड रस्त्यावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास अडचण येत आहे.
माहितीनुसार, विद्यापीठ गणेश खिंड परिसरात मुसळधार पावसामुळे स्त्यावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.याच बरोबर अर्ध्याच्यावर चार चाकी पाण्यात बुडाले आहे. आज शनिवार असल्याने सरकारी आणि अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी असते यामुळे रस्त्यावर वर्दळ नेहमीपेक्षा कमी होती. मात्र पावसामुळे दुचाकी आणि चार चाकी रस्त्यावर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे पुणे शहरात आज कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती, तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असल्याने पुणेकरांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरात आज झालेल्या पावसामुळे पुणे मनपाची ड्रेनेज व्यवस्था कोलमडली आहे. शहरातील बहुतेक भागात ट्रॅफिक जॅम झाल्याने नागरिकांचे हाल होत आहे. पाणी निचरा होण्यासाठी जागाच नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणीरस्त्यांवर पाणी साचत आहे. मात्र 7000 करोड रुपये दर वर्षी घरपट्टी कर वसूल करणारी पुणे मनपा या रकमेचा काय करते असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे.
#IMPAlert: पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती आहे. तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये.
पुण्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण महापालिका… pic.twitter.com/iYuVAbBHgE
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) June 8, 2024
साडेपाच वाजेपर्यंत कोणत्या भागात किती पाऊस
मिळालेल्या माहितीनुसार, साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर 67.4, पाषाण 56.8, इंदापूर 11.5, हडपसर 3.0, हवेली 1.5, बल्लाळवाडी 0.5 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
पुण्यातील नालेसफाईमधला गोलमाल उघड…
तर पुण्यातील नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप प्रसिध्दी प्रमुख पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे अमोघ ढमाले यांनी केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, काल अवघ्या काही मिनिटांच्या पावसात पुण्यात सिंहगड रस्ता, विद्यापीठ रस्ता, टिंबर मार्केट अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या पावसामुळे पुण्यात पूरपरिस्थिती सारखी स्थिती निर्माण झाली होती.
या गंभीर परिस्थितीची मुळ कारणे शोधताना, शहरातील नालेसफाईमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नालेसफाईसाठी पुणे महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो. तरीही, शहरातील नाले स्वच्छ नसल्यामुळे पावसाच्या पाण्याने नाले तुंबतात व रस्त्यावर पाणी साचते. ही स्थिती शहरातील जनतेसाठी जीवघेणी ठरू शकते.
पुणेकरांना पावसाने झोडपले ! नागरिक वाहनांमधेच अडकून पडलेत.
–#Rain #rainydays #punerain #punecity #puneweather #raintoday #rainyseason #UnseasonalRain #PuneNews #LetsUppNews #LetsUppMarathi #BreakingNews pic.twitter.com/tUvXhLiLqz— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 8, 2024
पुण्यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात, पुढील 3 दिवसांसाठी अलर्ट जारी
आज काही मिनिटांच्या पावसाने नालेसफाई कशा प्रकारे केली असेल याची पितळ उघडे पडले आहे. नियोजनबद्ध विकासामुळे पुणे शहर अजून काय काय बघणार याची कल्पना न केलेली बरी. असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस… नागरिकांचे पुरते हाल
पुण्यात दुपारपासून आलेल्या पावसाने जोरदार बॅटिंग केली. अचानक काळोख पडल्याने प्रवाशांची पाण्यातून वाहने काढताना मोठी दमछाक होत आहे.
–#Rain #rainydays #punerain #punecity #puneweather #raintoday #rainyseason #UnseasonalRain #PuneNews pic.twitter.com/EMxbZKlrQ1— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 8, 2024