पुणे हादरलं! शनिवार वाडा परिसरात आढळली बेवारस बॅग; बॉम्बशोध पथकाकडून तपास
Phon Call Bomb Shaniwar wada Area : पुण्यात शनिवार वाडा परिसरात बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याचा पोलीस कंट्रोल रूमला फोन आल्याची माहिती समोर आली आहे. असा फोन येताच पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. शनिवार वाडा परिसरात नागरिकांना येण्यास प्रतिबंद केला आहे. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांना शनिवार वाडा परिसरात कुठलीही बॅग आढळून आली नाही. ज्या नंबरवरून फोन आला त्या व्यक्तीचं लोकेशन ट्रेस करण्याच काम पोलिसांकडून चालू आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
पुणे हादरलं! शनिवार वाडा परिसरात आढळली बेवारस बॅग; बॉम्बशोध पथकाकडून तपास
–#Punebomb #pune_accident #punepolice #shanivarwada #Pune #maharashtra #letsuppmarathi pic.twitter.com/Mcugn0iI70— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 1, 2024
शोध सुरू
आज सकाळी साडेनऊच्या वाजेच्या सुमारास शनिवार वाड्यासमोर एक बेवारस बॅस असल्याचा पोलिसांना फोन आला होता. त्यानंतर बेवारस बॅग सापडल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला बोलावलं. त्यानंतर बॉम्ब शोधन पथकाने तपास सुरु केला आहे. दरम्यान, आज शनिवार सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने लोक शनिवार वाडा पाहण्यासाठी आले होते. मात्र, सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी सर्व पर्यटकांना शनिवार वाड्यातून बाहेर काढलं आहे. सध्या परिसराला पोलिसांनी घेरलं असून बॉम्ब शोध पथकाकडून शोध सुरू आहे.