Download App

Pune Rain: सरकारची उदासीनता, राजीव बजाज वैतागले; 35 मिनिटांच्या प्रवासाला लागले साडेचार तास

  • Written By: Last Updated:

पुणे : हवामान खात्याने पुणे शहराला आज (दि.26) अतिमुसळधार पावसाचा (Pune Rain) इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्या आली आहे. तर,दुसरीकडे मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यात काल (दि.25) संध्याकाळी मुसळधार पावसाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला अक्षरशः झोडपून काढले. याचा फटका सामन्या नागरिकांसह अनेत दिग्गजांनाही बसला असून, रोजच्या 35 मिनिटांच्या प्रवासाला काल साडे चार तास लागल्याचा अनुभव बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी त्यांना बसलेल्या वाहतूक कोंडीचा अनुभव सांगितला आहे.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर निर्णय

राजीव बजाज काय म्हणाले?

पावसाचा फटका बसलेल्या राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी त्यांचा अनुभव कथन करताना म्हटले आहे की, दररोज मला आकुर्डीतल्या कार्यालयातून कोरेगाव पार्कमधील घरी पोहोचायला साधारण 35 मिनिटांचा कालावधी लागतो. पण बुधवारी (दि.25) मला साडेचार तास लागले. मी संध्याकाळी पावणेपाच वाजता निघालो होतो. घरी पोहोचायला नऊ वाजून गेले, असे बजाज यांनी सांगितले आहे.

व्हिडिओला लाईक केलं तरी चौकशी होणार; पुणे पोलिसांचा घाम फोडणारा आदेश नेमका काय?

उत्तरदायित्व नसल्याचेच हे धडधडीत उदाहरण

पुढे बजाज म्हणाले की, मी तरी कारमधून प्रवास करत होतो. पण पादचारी, दुचाकीस्वार, रिक्षा आणि बसमधून प्रवास करणारे आणि दुचाकीवरून जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना नागरिकांप्रती कोणत्याही प्रकारचे उत्तरदायित्व नसल्याचेच हे धडधडीत उदाहरण आहे, असे म्हणत बजाज यांनी नाराजी व्यक्त केली.

follow us