Download App

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर तैनात

Pune Rain Update : पुण्यात (Pune) सुरु असणाऱ्या संततधार पाऊस आणि खडकवासला (Khadakwasla) धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे

  • Written By: Last Updated:

Pune Rain Update : पुण्यात (Pune) सुरु असणाऱ्या संततधार पाऊस आणि खडकवासला (Khadakwasla) धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी आज (4 ऑगस्ट) रोजी भारतीय लष्कराच्या (Indian Army) सहाय्याची मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेत भारतीय सैन्य दलाने एकता नगरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक पूरग्रस्त मदत तुकडी त्वरीत तैनात केली आहे.

माहितीनुसार, पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश करण्यात आला आहे. या तुकडीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या पायदळातील जवान, बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुपचे अभियंता कार्य दल आणि खडकीच्या लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाचा समावेश आहे.

ही तुकडी बचाव नौका, मानवरहीत ऑटोमॅटिक हेलिकॉप्टर्स (क्वाडकॉप्टर) आणि इतर आवश्यक बचावसाधनांनी सुसज्ज आहे. ही लष्करी तुकडी येऊन दाखल झाल्यानंतर, बचावतुकडीच्या प्रमुखाने (कमांडर) परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरी प्रशासनासोबत प्राथमिक पाहणी केली. खडकवासला धरणातून पाण्याचा वाढीव विसर्ग सुरु केल्याने एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

नागरी प्रशासनाच्या सहकार्याने, भारतीय लष्कराच्या या तुकडीने जलमय भागातील सर्व इमारती आणि घरे रिकामी करण्यास सुरुवात केली असून, रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. पूरग्रस्त भागाचा परिणामकारक आढावा घेऊन प्रभावी उपाययोजना करण्यासाठी क्वाडकॉप्टर आणि फुगवता येण्याजोग्या रबरी नौकांच्या सहाय्याने टेहळणी करण्यात येत आहे.

सेमी फायनलमध्ये पराभव, तरीही पदक जिंकणार लक्ष्य सेन, जाणून घ्या कसं

सध्या द्वारका अपार्टमेंटमधून, काही अडकलेल्या लोकांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्या निवासी इमारतींमध्ये आपत्कालीन निर्गमन व्यवस्था देखील तैनातकरण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी अतिरिक्त राखीव मदत तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

follow us