Download App

Pune Rains Update: पुन्हा रेड अलर्टचा इशारा, शुक्रवारीही पुण्यातील शाळा, महाविद्यालये बंद राहणार

उद्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच काही तालुक्यांमध्येही शाळा बंद राहणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Pune Heavy Rain Update: पुणे (Pune Rain) शहराला बुधवारी मुसळधार पावसाने झोपडले. खडकवासला (Khadakwasla Dam) धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर शहरातील अनेक भागात पाणी घुसले आहे. इमारतींमध्ये पाणी घुसल्याने नागरिक हे अडकून पडले होते. जनजीवन ठप्प झाले होते. काही ठिकाणी नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकून पडण्याने त्यांच्या बचावासाठी लष्कराला पाचारण करावे लागले आहेत. तर उद्या 26 जुलै रोजीही हवामाने विभागाने (Meteorological Department) रेड अलर्ट (अतिवृष्टी) इशारा दिला आहे. त्यामुळे दक्षता म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे.

उद्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच काही तालुक्यांमध्येही शाळा बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.(Pune Rains Update: Red alert again, schools and colleges in Pune will remain closed on Friday)


Pune Rain Alert : पावसाचा पुणे – मुंबईला फटका, रेल्वे वाहतूक बंद; ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द


या भागात अतिवृष्टीचा इशारा

हवामाने विभागाने पुणे शहर व घाट क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शाळा, महाविद्यालये, तसेच पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Pune Rain : कोथरुड, बाणेरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, वाहतूक कोंडीने नागरिक हैराण


खडकवासला धरणातून विसर्ग वाढविला

खडकवासला धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. आज रात्री हा विसर्ग हा चाळीस हजार क्युसेक इतका करण्यात आलाय.


पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक थांबविली

26 जुलै रोजी पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या डेक्कन, प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आलीय. तसेच मुंबईकडून पुण्याकडे जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

26 जुलै रोजीची परीक्षा पुढे ढकलली
पावसामुळे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा तारीख बदलण्यात आली आहे. आता 10 वीची 31 जुलैला तर 12 वीचा परीक्षेच्या पेपर 9 ऑगस्टला होणार आहे.

follow us