Download App

पुण्यातील ‘त्या’ जमिन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, रोहित पवारांचं अजितदादांना खुलं आव्हान

Rohit Pawar On Ajit Pawar : पुण्याच्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borvankar)यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर (Madam Commissioner)पुस्तकामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले. पुस्तकामध्ये अजितदादांनी येरवडा कारागृहाच्या शेजारील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारितील तीन एकर जमिन एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह केल्याचा आरोप केला.

Rohit Pawar : मंत्री पदावरून ते एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारतील, रोहित पवारांचा टोला

त्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांणा उधाण आलं आहे. त्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, बिल्डर क्षेत्रामध्ये मी स्वतः नाही. पण जमीन कोणी कोणाची, कोणाला दिली याची चौकशी सरकारने करावी. त्याबाबतीत न्यायालयीन चौकशी करावी, असे आव्हान यावेळी आमदार रोहित पवार यांनी सरकारला दिलं.

सुप्रिया सुळे होणार पुण्याच्या नव्या कारभारी! अजितदादांनंतर पवारांचा होल्ड पुन्हा मिळवणार?

आमदार रोहित पवार म्हणाले की, या सर्व विषयांवर बोलत असतानाच युवकांच्या प्रश्नांवर देखील बोलण्याची गरज आहे. आपण चर्चा करत असताना फक्त कोणी कोणाला काय म्हणालं? कोणाला कोणतं पद? याबद्दलच बोलत असतो. फक्त राजकीय दृष्टीकोनातून बोलण्यापेक्षा आज महाराष्ट्रात सामाजिक दृष्टीकोनातून युवकांसमोर अनेक अडचणी आहेत.

आज कोणीही सरकारच्या विरोधात बोलत असेल तर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद केले जाते. त्यांचे पेड ट्रोलर्स आहेत, त्यांचा वापर करुन कंप्लेंट केलं जातं. त्यानंतर ब्ल्यू टीक घालवलं जातं. अशा प्रकारे कोंडी केली जाते. अशा प्रकारे संविधानाला बाजूला करुन सोशल मीडिया देखील बंद करणार असाल, त्या गोष्टी लोकांच्या लक्षात येतात.

त्यामुळे सरकारने जमीन त्याचबरोबर जे काही पदं आहेत, ते सरकारने त्यांच्या लेवलवर बघावे, पण आमचं मत आहे की, युवक वर्गाचे जे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचे प्रयत्न सरकारने करावेत, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, सध्या राज्यात असलेल्या शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदावरून तूतू मैंमैं सुरू झाली आहे. त्यात जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील वादावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पत्रकारांनी पत्र विचारला असता ते म्हणाले की, ‘आता ते मंत्री पदावरून तूतुमेमे करत आहेत. मात्र पुढे जाऊन एकमेकाच्या डोक्यात खुर्च्या देखील मारायला कमी करणार नाहीत.

दरम्यान येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. त्याअगोदर 24 तारखेला आशीर्वाद दिवस म्हणून आम्ही लाल महाल, फुले वाडा, लहूजी वस्ताद या ठिकाणी जाणार आहोत. येथे पवार साहेब युवा वर्गाला संबोधित करणार आहेत. तर आज 35 ते 40 लायब्ररी यांना भेट देणार आहे. युवांचा प्रश्न या यात्रेतून मांडणार आहे. आज पद जमीन या बाबत बोलले जाते पण युवकांच्या प्रश्ना वर बोलले जात नाही. असं यावेळी रोहित पवार म्हणाले.

Tags

follow us