Shirur News : शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील महिला शेतकरी लताबाई भास्कर हिंगे यांनी एक आगळीवेगळी मागणी केली आहे. या महिला शेतकऱ्याने आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने तहसिलदारांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. त्यानंतर महिला शेतकऱ्याच्या या मागणीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.(Pune shirur Women farmers demand Give the helicopter to go to the farm latebai hinge)
झालं असं की, पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील एका शेतकरी महिलेने प्रशासनाकडे हेलिकॉप्टर खरेदी करण्याची मागणी केली आहे. आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क हॅलीकॉप्टर घेण्यासाठी तहसिलदारांकडे आर्थिक अनुदानाची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीची परिसरात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
MIDC ची मागणी करतोय तर तुमच्या पोटात का दुखतं?, NCP कार्यकर्त्यांचा शिंदेना थेट सवााल
शिरुर तालुक्यातील निमोणे गावच्या लताबाई हिंगे यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. त्यांनी 5 डिसेंबर 2022 रोजी शिरुर तहसील कार्यालयात रस्ता मागणीचा अर्ज केला होता. त्या अर्जावर तत्कालीन तहसीलदार यांनी एका तारखेची सुनावणी घेऊन संबंधित मंडळ अधिकारी यांना स्थळपाहणी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर आदेश प्राप्त झाल्यापासून मंडळ अधिकारी यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. शेतकरी लताबाई हिंगे यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या कार्यालामध्ये स्थळ पाहणी करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेकवेळा आपले काम सोडून हेलपाटे मारुनही त्यांना कुणी दाद दिली नाही, यामुळे त्यांना मोठा मनःस्तापही सहन करावा लागला.
त्यानंतर काही दिवसांनी लताबाई हिंगे आणि संबंधित मंडळ अधिकारी यांची भेट झाल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी लवकर स्थळ पाहणी करतो, मला सध्या वेळ नाही, मी नवीन बदली होऊन आलेलो आहे, अशी कारणे देत गेल्या अनेक दिवसांपासून स्थळ पाहणी करण्यास टाळाटाळ केली.
हिंगे यांच्या शेतामध्ये पीक काढणीला आलेले असतानाही त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे तयार शेतमाल बाहेर काढायचा कसा? असा प्रश्न त्यांना सतावतो आहे. महिला शेतकरी लताबाई हिंगे यांना आपल्या शेतात जायला रस्ता नसल्याने शेतकरी महिलेची थेट हेलिकॉप्टर खरेदी करण्याची मागणी केलीय.