Download App

आमदारांच्या अपात्रता निकालाबद्दल कसलीही उत्सुकता अन् काळजी नाही : सुषमा अंधारे

Sushma Andhare : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification case of Shiv Sena MLAs)निकालासंदर्भात आपल्या मनात कसलीही उत्सुकता नाही. या निकालाबद्दल मी पूर्णपणे निरंक आहे. कारण न्याय द्यायला उशीर करणे हा देखील एक प्रकारे अन्यायच असतो, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे.

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमध्ये ब्रेक, सरकारने दिले ‘हे’ कारण

आज 10 जानेवारीची तारीख देऊनही त्याच्यासाठीची संध्याकाळ गाठावी लागते. त्यामुळे किती टोलवाटोलवी करावी लागते, त्यासाठी किती टोलवावं लागतं. त्याला काही मर्यादा आहे की नाही? त्यामुळे आज राहुल नार्वेकर हे काय बोलणार? याबद्दल मला काही बोलायचं नाही.

ट्रकचालकांकडून पुन्हा आंदोलनाचं हत्यार; मुंबई-अहमदाबाद मार्गावर केला चक्काजाम

एकमात्र निश्चित आहे की, यामध्ये जोकाही एवढा वेळखाऊपणा केला आहे. यामध्ये जवळपास पाच वर्षातील सगळे अधिवेशन या अपात्र आमदारांना उपभोगायला मिळाले आहेत. सोबतच त्यांना पाच वर्षाचा निधी वापरायला मिळाला आहेच.

त्यातून काही निकाल लागलाच तर राम मंदिराचा सोहळा झाल्यानंतर जवळपास लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची वेळ आहे. त्यामुळे या 10 ते 15 दिवसांसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उगाच वेळ घालवत आहेत का? असं वाटण्याची परिस्थिती असल्याचे यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारदेखील आहेत. त्यामुळे आमदार म्हणून त्यांनी कोणाला भेटावं, कोणाला भेटू नये, हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण ते आता फक्त आमदार नाहीत आणि फक्त विधानसभेचे अध्यक्ष नाहीत. ते आता सध्या एका लवादाचे प्रमुख आहेत. त्या ठिकाणाहून त्यांना एका महत्वाचा निर्णय द्यायचा आहे.

जो राज्याच्या राजकारणात नाही तर देशाच्या राजकारणामध्ये एक बेंचमार्क ठरणार आहे. त्यामुळे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी काही आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. त्यामुळे नार्वेकर हे निकाल देण्याच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले. नार्वेकरांसाठी जरी ते मुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी ते प्रतिपक्षी आहेत. असेही यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

follow us

वेब स्टोरीज