ट्रकचालकांकडून पुन्हा आंदोलनाचं हत्यार; मुंबई-अहमदाबाद मार्गावर केला चक्काजाम

ट्रकचालकांकडून पुन्हा आंदोलनाचं हत्यार; मुंबई-अहमदाबाद मार्गावर केला चक्काजाम

Truck Drivers Protest : हिट अॅण्ड रन प्रकरणी मुंबईत पुन्हा एकदा ट्रकचालकांकडून आंदोलनाचं (Truck Drivers Protest) हत्यार उपसण्यात आलं आहे. मुंबईत आज मुंबई-अहमदाबाद मार्गावर ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. या आंदोलनामध्ये रिक्षाचालकांनी सहभाग नोंदवला असून पोलिस घटनास्थळी धाव घेताच आंदोलक ट्रकचालक पसार झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Vibrant Gujarat Summit : ‘जे बोलतो ते पूर्ण होतं’; PM नरेंद्र मोदींनी दिली जनतेला गरंटी

मागील काही दिवसांपासून हिट अॅण्ड रन प्रकरणी देशभरात ट्रकचालकांनी संप पुकारला होता. अद्याप या प्रकरणी केंद्र सरकारकडून तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे आज ट्रकचालकांनी मुंबई अहमदाबाद मार्गावरच गाड्या उभ्या करत आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळे सगनई नाक्यावरील मुख्य रस्त्यावर ट्रकचालकांची मोठी रांगच लागल्याचं पाहायला मिळालं होतं.

ट्रकचालकांच्या या आंदोलनात रिक्षा आणि ओला उबेर चालकांनीही भाग घेतला होता. या आंदोलनामुळे वसईला जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची रांग लागल्याचं दिसून आलं होतं. या आंदोलनादरम्यान, रस्त्यावरील वाहने बाजूला करण्याच्या कामात तासाभराचा कालावधी वाया गेला.

गरीब जनतेचा श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ‘गोड’ होणार : शिंदे सरकार वाटणार ‘आनंदाचा शिधा’

काही दिवसांपूर्वीच हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून अनेक विधेयकं मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे मोटार वाहन नियम होय. या नियमांमध्ये सरकारने बदल केला आहे. केंद्र सरकारच्या या नव्या धोरणाविरोधात राज्यातील ट्रक चालकांकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलन सुरु असतानाच अचानक हिंसक वळण लागलं होतं.

काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील JNPT मार्गावर ट्रक चालकांचं आंदोलन सुरु असतानाच भर रस्त्यावरच ट्रक आणि डंपर चालकांनी वाहने उभी केली होती. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केल्याने वाहतूक जाम झाली होती. वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्याबाबत पोलिसांकडून आंदोलकांना सांगण्यात आलं होतं, मात्र आंदोलकांनी वाहने बाजूला घेण्यास विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकानूसार अपघातास जबाबदार ट्रकचालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याच कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देश भारतील सर्वच ट्रक चालक संपावर गेले आहेत. ट्रकचालकांच्या आंदोलनावर अद्याप केंद्र सरकारकडून तोडगा काढण्यात आला नसल्याने आज पुन्हा ट्रकचालकांनी आंदोलन केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube