मनमाडच्या संपावर मोठा निर्णय! राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरु, 24 तासात पुरवठा…

मनमाडच्या संपावर मोठा निर्णय! राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरु, 24 तासात पुरवठा…

Petrol Shortage Maharashtra : ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (Transport Association)संपावर तोडगा निघाला असल्याची माहिती नाशिकचे (Nashik) जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma)यांनी माध्यमांना दिली आहे. आज मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि टँकर आणि ट्रक चालक, (Truck drivers strike)मालक यांच्या यांच्यात बैठक झाली. आपसात झालेली चर्चा सफल झाली असून त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर आंदोलनकर्ते कामावर जाण्यासाठी तयार झाले असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.

Hit and Run : ‘मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडं लक्ष दिलं असतं तर’.. राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, आज झालेल्या बैठकीमध्ये ट्रकचालकांचे प्रश्न समजून घेतले आहेत. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत. त्या शासनाकडे मांडणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानंतर ट्रक ड्रायव्हर काम करण्यासाठी तयार झाले आहेत. त्यामुळे आत्तापासून इंधनपुरवठा सुरु झाला आहे. येत्या 24 तासात नियमित इंधनपुरवठा होणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांच्या 12-12 च्या फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू; रामदास आठवलेंनी डिवचले

हिट अॅण्ड रन कायद्याला देशभरासह राज्यातही जोरदार विरोध होताना दिसत आहे. राज्यातील हजारो ट्रकचालकांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर इंधनाचा पुरवठा करणारे टॅंकरचालक देखील संपावर गेले आहेत. त्यामुळं आता या आंदोलनाचा परिणाम चांगलाच दिसू लागला आहे.

मनमाड येथील एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लँटमधून राज्यातील अनेक भागांत इंधन पुरवठा होतो. संपामुळे हजारो टँकर डेपो बाहेर थांबले आहेत. यासंदर्भात सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकारी आणि टँकर आणि ट्रक चालक, मालक यांच्या यांच्यात बैठक झाली.

यामध्ये नवीन वाहन कायद्याबद्दल ट्रकचालकांच्या काही गैरसमज झाले आहेत. त्याबद्दल एक वर्कशॉप घेऊन त्याच्याबद्दल चर्चा केली जाईल. त्यामागचा हेतू सर्वांना सांगितला जाईल. अनेकदा एखाद्या कायद्याबद्दल सामान्या लोकांमध्ये गैरसमज पसरला जातो. त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे.

त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्याचबरोबर ड्रायव्हरच्या मागण्या केंद्र सरकारकडे पाठवण्याची विनंती केली आहे. त्या मागण्या तात्काळ केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकार जलज शर्मा यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज