Hit and Run : ‘मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडं लक्ष दिलं असतं तर’.. राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

Hit and Run : ‘मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडं लक्ष दिलं असतं तर’.. राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

Hit and Run Law :हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run Law) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचे पडसाद राजकारणातही उमटत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर खरमरीत टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हिट अँड रनच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी आधी मालकाच्या मुलाच्या (आदित्य ठाकरे) कारनाम्याकडे पाहिले असते तर हिट अँड रनबद्दल बोलण्याची हिंमत झाली नसती, अशा शब्दांत नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

राणे पुढे म्हणाले, हिट अँड रन कायद्यात बदल केल्यामुळे या कायद्यासंदर्भात काही जणांचे आक्षेप असू शकतात. त्याबद्दल केंद्र सरकार निश्चित विचार करील. पण, 2022 मधील आकडे पाहिले तर 47 हजार लोकांनी या हिट अँड रनमध्ये जीव गमावला आहे. या गोष्टी विचारात घेऊन त्या दृष्टीने केंद्र सरकारकडून काही बदल होत असतील तर संजय राऊतसारख्या लोकांनी सरकारवर टीका करण्याचं काही कारण नाही. यावर टीका करणाऱ्या संजय राऊतने त्याच्या मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडे बघितले असते तर हिट अँड रनबद्दल बोलण्याची हिंमतही झाली नसती. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात पोलीस चौकशीतून बरंच काही बाहेर येणारच आहे. त्यामुळे हिट अँड रनवर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राऊत आणि त्याच्या मालकाला नाही.

Hit and Run : नव्या कायद्यात नेमकं काय? कठोर तरतुदींचा उल्लेख करत असीम सरोदेंनी केंद्राला सुनावलं

काशी कलंकित झाली असा अग्रलेख आज सामनात लिहिला गेला. खऱ्या अर्थानं काशी कलंकित कधी झाली तर काही आठवड्यांआधी तुमच्या मालकाचा मुलगा जो आपल्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी काशीला गेला होता. त्यामुळे काशीमध्ये गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली होती. म्हणून काशीला शुद्ध ठेवण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी विचारांचं राज्य आणि केंद्र सरकार नक्कीच करील. मालकाचा मुलगा काशीत येऊन आपलं पाप धुण्याचा जो काही प्रयत्न करत आहे त्याहीबद्दल अग्रलेख लिहिला तर बरं होईल, असा खोचक टोला राणेंनी लगावला.

उद्धव ठाकरेंना दहा जनपथचे आदेश  

भांडुपमध्ये बसून सोम्यागोम्याने महाविकास आघाडी इंडीच्या जागावाटपाबद्दल बोलू नये. तुमची लायकी किती आहे हे तुमच्या मालकाला (उद्धव ठाकरे) काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खडसावलंय. याची बातमीही आमच्याकडे आहे. दहा जनपथ येथून उद्धव ठाकरेंना आदेश आलेत की संजय राऊतचं तोंड बंद करा. म्हणून जागवाटपाच्या चर्चेच्या मोठ्या बाता करण्याआधी मालकाची थोडी जरी इज्जत ठेवायची असेल तर सकाळचं तोंड बंद करा आणि एकदाचे घरी बसा.

Sanjay Raut : ‘भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायचीय’ अदानींविरोधात रस्त्यावर उतरण्याचा राऊतांचा इशारा

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube