Pune Traffic : काय सांगता? 2025 मध्ये प्रत्येक पुणेकरांचे वाया गेले 152 तास

वाहतूक कोंडीत पुण्याच्या नावावर नकोसा रेकॉर्डही नोंदवला गेला आहे. 'टॉम टॉम'तर्फे 'ट्रॅफिक इंडेक्स 2025' या अहवालात नेमकं काय?

Pune Traffic : काय सांगता? 2025 मध्ये प्रत्येक पुणेकरांचे वाया गेले 152 तास

Pune Traffic : काय सांगता? 2025 मध्ये प्रत्येक पुणेकरांचे वाया गेले 152 तास

Pune In Fourt Rank In Traffic Jam : पुण्यात वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. पण, 2025 मध्ये पुणेकरांचे थोडे-थोडके नव्हे तर, 152 तास वाया गेल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, वाहतूक कोंडीत पुण्याच्या नावावर नकोसा रेकॉर्डही नोंदवला गेला आहे. ‘टॉम टॉम’तर्फे ‘ट्रॅफिक इंडेक्स 2025’ या अहवालात नेमकं काय? याचबद्दल जाणून घेऊया…
युपीआयची मोठी झेप; थेट क्रेडिट कार्ड कंपन्यांना तगडं आव्हान देण्याच्या तयारीत

वाहनांचे वेग मोजण्यासाठी जीपीएस डेटाचा आधार
‘टॉम टॉम’तर्फे ‘ट्रॅफिक इंडेक्स 2025’ या अहवालात जगभरातील वाहनांचा वेग मोजण्यासाठी ‘जीपीएस डेटा’चा आधार घेण्यात आला आहे. जागतिक स्तरावर 492 शहरांमधून पहिल्या 50 शहरांमध्ये बेंगळुरू, पुण्यासह हैदराबाद, चेन्नई, जयपूर, कोलकता, नवी दिल्ली आदी शहरांचा समावेश आहे.

Davos Summit : मुख्यमंत्री कोणताही असो दरवर्षी जानेवारीत गाठतो दाओस; पण तिथे नक्की काय होतं?


वाहतूक कोंडीत पुणे कितव्या स्थानावर?
भारतात सर्वाधिक वाहतूक कोंडीमध्ये पहिल्या दहामध्ये बेंगळुरू आघाडीवर आहे तर, जगात वाहतूक कोंडीत मेक्सिकोचा पहिल्या क्रमांकावर नंबर लागतोय.गेल्या वर्षी वाहतूक कोंडीत बेंगळुरू तिसऱ्या स्थानावर होते जे आता दुसऱ्या स्थानावर तर, पुणे चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2025 मध्ये प्रत्येक पुणेकरांचे वाहतूक कोंडीत तब्बल 152 तास वाया गेल्याचेही समोर आले आहे.

Pune News : दंडाची रक्कम बेशिस्त पुणेकरांना वठणीवर आणणार?; वाहतूक विभागाचा मोठा निर्णय

वाहतूक कोंडीतील पुण्याची स्थिती कशी?

वाहतूक कोंडीत 2022 मध्ये पुणे सातव्या, 2023 : सहावा, 2024 चौथ्या तर, 2025 मध्ये पाचव्या क्रमांकांवर असल्याचे समोर आलयं. एकीकडे वाहतूक कोंडीमुळे त्रासलेल्या पुणेकर 15 मिनिटात फक्त 4.5 किमी अंतर पार करू शकले तर, बंगळूरूच्या नागरिक 15 मिनिटात 4.2 किमी अंतर पार करू शकले.
Exit mobile version