Pune News : दंडाची रक्कम बेशिस्त पुणेकरांना वठणीवर आणणार?; वाहतूक विभागाचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 26T133805.400

Pune No Parking Fine News : पुणे शहर हे वाहतुकींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा नो पार्किंगच्या मुद्द्यावरून पुणेकर आणि वाहतूक पोलिसांमध्ये वादाचे प्रसंग झाल्याचा यापूर्वीचा इतिहास आहे. अनेकदा दंडाची रक्कम घेऊनही नागरिक नो पार्किंगमध्ये वाहनं लावत असल्याचे दिसून आले आहे. अशाच बेशिस्त नागरिकांना शिस्त लाववण्यासाठी वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मात्र, पुणेकरांचा खिसा रिकामा होणार आहे. (No Parking Fine Increased By Pune Traffic Police)

Video : “वाद असले तरी वादळ नाही” : राम शिंदे अन् विखे पाटलांना जवळ घेत फडणवीसांचा ‘खास’ मेसेज

नो पार्किंगमध्ये गाड्या लाववणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाकडून दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. याबाबत शहर वाहतूक विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांना पहिल्यांदा टोइंगसह ७८५ रुपये, मोटारचालकांना एक हजार ७१ रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

फडणवीसांनी पटोलेंबरोबर राऊतांनाही ओढलं; म्हणाले, हे लोक नुसतेच बोलघेवडे

तर, दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास अनुक्रमे एक हजार ७८५ रुपये आणि दोन हजार ७१ रुपयांचा दंड वाहन चालकांना भरावा लागणार आहे. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेकडून नागरिकांना करण्यात आले आहे. दरम्यान, वाहतूक शाखेकडून दंडाच्या रकमेत करण्यात आलेल्या भल्यामोठ्या वाढीनंतर तरी बेसिस्त पुणेकरांना शिस्त लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

AAP च्या एन्ट्रीने बिघडला खेळ! केजरीवाल-मोदी संघर्षात काँग्रेसचा सायलेन्स मोड

धडक कारवाईची मोहीम सुसाट

वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून यापूर्वीच धडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.  यात सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न वापरणे, माल ओव्हरलोड करणे आणि मालवाहू वाहनांमध्ये प्रवाशांची ने-आण करणे यासारखे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यानंतर आता नो पार्किंगच्या गाड्यांवरदेखील पोलिसांची करडी नजर असणार आहे.

Tags

follow us