Vanraj Andekar Murder Case : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची भर चौकात हत्या करण्यात आली. पुण्यातील नाना पेठेतील डोके तालमीसमोर वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एवढेच नाही तर आरोपींनी गोळी झाडल्यानंतर कोयत्यांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलीयं. आंदेकर हत्या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आलीयं. यामध्ये वनराज आंदेकर यांच्या दोन सख्या बहीणी आणि दोन दाजींचा समावेश असल्याची माहिती पुणे शहर सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलीयं.
कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून वनराज आंदेकर यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचं रंजनकुमार शर्मा यांनी दिलीयं. आंदेकर हत्या प्रकरणी आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करणअयात आलीयं. यामध्ये आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, कल्याणी कोमकर, जयंत कोमकर, आणि गणेश कोमकर यांचा समावेश आहे.
फडणवीस शेवटच्या पेशव्याचे उत्तराधिकारी, ते शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू…; संजय राऊतांची जहरी टीका
वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचल्याची धक्कादायक माहिती आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि वनराज यांचे वडील बंडू आंदेकर यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. वर्चस्वाच्या वादातून सुनेने जावयानेच या कट रचलल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 10 आरोपींची ओळख पटली असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीन जणांची कसून चौकशी सुरु
आहे.
बहिणीनेच दिली धमकी :
गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आहे. त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. महापालिकेने अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडले. यानंतर कुटुंबात वाद सुरू झाला. आंदेकर कुटुंबीयांच्या आशीर्वादानेच गणेश कोमकर गुंडगिरी करत होता. गणेश कोमकर याने स्वतःची टोळी तयार केली होती. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकान अतिक्रमण पाडायला लावल्याच्या रागातून बहिनीने वनराज यांना तुला पोरं बोलवून ठोकतेच अशी धमकी दिली होती. त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला.