वाघोली येथे गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा मृत्यू

Pune Fire News :  पुण्याच्या वाघोली येथील उबाळे नगर परिसरातील कवडे वस्ती मधील शुभ सजावट या गोडाऊनला रात्री ११.४३ सुमारास आग लागलेली होती. घटनास्थळी ४|५ सिलेंडरचे स्फोट झाले. गोडाऊन मधे लग्न समारंभ व सजावट, लायटिंग, वायर असे गोडाऊन मध्ये साठा होता, त्यात कुशन व कारपेट जास्त असल्याने व पेंटिंगचे काम सुरू असल्यामुळे आगीची तीव्रता भीषण […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T112823.463

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 06T112823.463

Pune Fire News :  पुण्याच्या वाघोली येथील उबाळे नगर परिसरातील कवडे वस्ती मधील शुभ सजावट या गोडाऊनला रात्री ११.४३ सुमारास आग लागलेली होती. घटनास्थळी ४|५ सिलेंडरचे स्फोट झाले. गोडाऊन मधे लग्न समारंभ व सजावट, लायटिंग, वायर असे गोडाऊन मध्ये साठा होता, त्यात कुशन व कारपेट जास्त असल्याने व पेंटिंगचे काम सुरू असल्यामुळे आगीची तीव्रता भीषण होती.

आजू बाजूला असलेल्या गोडाऊन मधून चार इ-रिक्षा बाहेर काढण्यात आल्या , गोडाऊनच्या पाठीमागील असलेल्या इंडेन गॅस (सुमारे 400 सिलेंडर) गोडाऊनला सुरक्षित करण्यात आले. तेथेच असलेल्या रहिवाशी इमारतींना आगीची झळ पोहोचू नये याची दक्षता घेत रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितले.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

पीएमआरडीए अग्निशामक दल व पुणे महापालिका मिळून ०९ अग्निशमन वाहनांनी ४५ अग्निशमन जवानांनच्या साह्याने आग आटोक्यात आणली. यामध्ये तेथे काम करणाऱ्या एकूण ०३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पीएमआरडीए व पुणे महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग नियंत्रणात आणली आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊनकडे जवानांनी खबरदारी घेत आग पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे. पुणे ५ व पीएमआरडीए ४ अशी एकुण ९ अग्निशमन वाहने व जवान यांनी आग विझवली आहे.

Exit mobile version