Download App

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! कारण….

पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. येत्या 18 मे पासून आठवड्यातून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे, यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली आहे.

भुजबळांचा RSS ला मोलाचा सल्ला; म्हणाले, ‘अशा’ लोकांवर आरएसएसने..

पुणे महापालिका प्रशासनाकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यांशी चर्चा करुन पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात एकूण 20 ठिकाणी एअर व्हॉल्व बसवले असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी मिळण्याची समस्या कमी होणार आहे.

Imran Khan : खेळाचं मैदान गाजवणाऱ्या इम्रान खानला राजकारणानं पाठवलं तुरुंगात

आगामी काळात पाऊस कमी पडला तर अत्यावश्यक नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच आजूबाजूच्या गावातून टँकर आणता येतील तसेच टँक बंद ठेवता येतील. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आज घडीला 9.70 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शेती तसेच उद्योगांना देखील धरणातून पाणीपुरवठा होत असतो.

पुणे शहराचा पाणी वापर महिन्याला 1.5 टीएमसी इतका आहे. आठवड्यातील एक दिवस याप्रमाणे महिनाभर पाणीकपात केल्यास 0.25 टीएमसी पाणी वाचणार आहे. म्हणजेच पुण्याला किमान पाच ते सहा दिवस पुरेल इतकं पाणी वाचवण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय.

दरम्यान, पुणे महापालिकेने मुळशीमधून 5 टीएमसी पाण्याची मागणी केली असून यासाठी शासनाने एक सदस्यीय समिती नेमली होती. त्याचा पाठपुरवठा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Tags

follow us