Imran Khan : खेळाचं मैदान गाजवणाऱ्या इम्रान खानला राजकारणानं पाठवलं तुरुंगात

  • Written By: Published:
Imran Khan : खेळाचं मैदान गाजवणाऱ्या इम्रान खानला राजकारणानं पाठवलं तुरुंगात

Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) चे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान रेंजर्सने ही कारवाई केली आहे. क्रिकेटमधून नेता आणि नंतर पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इम्रानची ओळख नेहमीच चांगला कर्णधार म्हणून केली जाते. प्रत्येक कठीण प्रसंग सहज सोपा करण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने वर्ल्डकप चॅम्पियन होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. मात्र, राजकारणात आल्यानंतर ते वादातच राहिले आणि आता राजकारणाच्या खेळाने त्यांना तुरुंगात टाकले आहे. आज आपण इम्रान खानशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

वयाच्या 16 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण

5 ऑक्टोबर 1952 ला लाहोरच्या एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या इम्रान खान यांनी वयाच्या 16 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1971 मध्ये इंग्लंडविरुद्ध खान यांनी कसोटी पदार्पण केले आणि 1974 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 25 मार्च 1992 रोजी इम्रान यांनी शेवटचा एकदिवसीय सामनाही इंग्लंडविरुद्ध खेळला होता.

पाकिस्तानचा सर्वात यशस्वी कर्णधार

इम्रान खान 1982 मध्ये पाकिस्तानचा संघाचे 13 वे कसोटी कर्णधार बनले. यादरम्यान त्यांनी 48 कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले, 14 जिंकले आणि 8 गमावले. त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यांमध्ये 139 सामन्यांचे नेतृत्व केले. त्यापैकी 75 जिंकले, 59 पराभूत झाले. इम्रान खान पाकिस्तानचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. 1982-1992 या काळात त्यांनी एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून काम केले.

भारतीय अभिनेत्रीच्या अफेअरच्या अफवा

प्रकाशित वृत्तांनुसार इम्रान यांचे नाव ७०च्या दशकातील अभिनेत्री झीनत अमानसोबतही जोडले गेले होते. मात्र, झीनत किंवा इम्रान या वृत्तांबद्दल कधीच बोलले नाहीत. वास्तविक, एकदा झीनत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाहोरला गेल्या होत्या. येथे त्यांना इम्रान खान यांच्यासोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा झीनत म्हणाल्या होत्या की, आपण भूतकाळाबद्दल बोलू नये. आमची मुलं आता मोठी झाली आहेत. भूतकाळ भूतकाळातच राहू द्या.

मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त

राष्ट्रपतींच्या सांगण्यावरून क्रिकेटमध्ये पुनरागमन

पाकिस्तानच्या इतिहासातील इम्रान हे एकमेव क्रिकेटपटू आहे ज्यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झिया उल हक यांच्या सांगण्यावरून निवृत्ती पत्करावी लागली होती. खरे तर 1987 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला क्रिकेट वर्ल्ड सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे हताश झालेल्या इम्रान खान यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, झिया-उल-हक यांच्या सांगण्यावरून ते पुन्हा कर्णधार झाले आणि 1992 मध्ये पाकिस्तानने क्रिकेट विश्वचषक जिंकला.

भारतीय दिग्गजांचही इम्रान यांचे चाहते

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी त्यांच्या ‘इम्परफेक्ट’ या आत्मचरित्रात लिहिले आहे की, इम्रान खान जर त्यांचा कर्णधार असता तर आपण आणखी चांगला क्रिकेटर झालो असतो. आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असलेला इम्रान हा जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज होता, पण त्याच्या कर्णधारपदाच्या जोरावर त्याला मिळालेला आदर, त्यामुळे त्याला विशेष ओळख मिळाली. त्याचवेळी टीम इंडियाचा माजी फिरकीपटू मनिंदर सिंग म्हणाले होते की, ‘तो कर्णधार, प्रशिक्षक, मुख्य निवडकर्ता सर्वकाही होता. तो प्रतिभेचा जाणकार होता आणि खूप जिद्दीही होता. जगातील कोणत्याही फलंदाजामध्ये दहशत माजवण्याची क्षमता इम्रान खानमध्ये होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक युवा खेळाडू घडवले. ज्यात वसीम अक्रम आणि वकार युनूस यांचा समावेश आहे. रिव्हर्स स्विंगचा सुलतान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्रमने इम्रानकडून गोलंदाजीची कला शिकली.

राजकारणात प्रवेश

1992 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इम्रान यांनी 27 वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या राजकारणात पाऊल ठेवले होते. राजकारणी म्हणून त्यांच्याकडे कधीच लक्ष वेधले गेले नाही, परंतु 2018 मध्ये ते पाकिस्तानची राजकीय कमान हाती घेण्याच्या मार्गावर उभे राहिले. राजकीय इनिंगच्या सुरुवातीला इम्रान खान यांच्याकडे पाकिस्तानी मीडिया आणि तिथल्या लोकांनी लक्ष दिले नाही, पण 2018 मध्ये महिला आणि तरुणांच्या मोठ्या वर्गाने त्यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली. राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील वादांपासून दूर राहणे हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

2018 च्या निवडणूक प्रचारादरम्यान इम्रान खान यांच्यावर असभ्य भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता आणि निवडणूक आयोगाने त्यांना तसे न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. इम्रान खान यांनी 2008 मध्ये जगभरातून देणग्या गोळा करून त्यांची आई शौकत खानम यांच्या नावाने कॅन्सर हॉस्पिटल बांधले. 1996 मध्ये तेहरीक-ए-इन्साफची स्थापना झाल्यापासून, इम्रान हे पाकिस्तानच्या संसदेत निवडून आलेले त्यांच्या पक्षाचे एकमेव सदस्य आहेत.

तीन लग्न केले

इम्रान यांनी 1995 मध्ये ब्रिटिश जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न केले. जेमिमासोबत इम्रानला दोन मुले आहेत. पण नऊ वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेमिमा आणि इम्रान यांचा २००४ मध्ये घटस्फोट झाला. यानंतर 2014 मध्ये इम्रान यांनी टीव्ही अँकर रेहम खानसोबत लग्न केले. रेहम खानचे आई-वडील पाकिस्तानी असून, तिचा जन्म लिबियात झाला. दोघांचे लग्न केवळ 10 महिने टिकू शकले. नंतर त्यांनी एक पुस्तक लिहून इम्रानवर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले. यानंतर इम्रान खानने फेब्रुवारी २०१८ मध्ये बुशरा मनिकासोबत लग्न केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube