Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तथा पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून आज अटक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याबाबत पाकिस्तानच्या डॉन न्यूजने वृत्त दिले आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. खान यांना अल कदिर ट्रस्ट प्रकरणी अटक केल्याचे सांगण्यात आले.

 

पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या वकील मुसरत चीमा यांनीही खान यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली त्यांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. अनेक प्रकरणात जामीन मिळण्यासाठी खान आज न्यायालयात आले होते. ते पहिल्या दिवसापासून पाकिस्तानी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात वक्तव्ये करत होते.

खान यांना अटक का झाली ?

इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. पोलीस महानिरीक्षक म्हणाले, की इम्रान खान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती सामान्य आहे. कलम 144 लागू करण्यात आले आहे. पीटीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये उच्च न्यायालयाबाहेर अटकेदरम्यान झालेल्या हाणामारीत इम्रानचे वकिल गंभीर जखमी झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. इम्रान खान सातत्याने सरकार आणि पाकिस्तानी सैन्याविरोधात वक्तव्ये करत होते. सरकारची कोंडी करण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनेही केली होती. त्यामुळे शाहबाज सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. खान यांच्यावर विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते. त्यानंतर आज अखेर त्यांना अटक करण्यात आली. यानंतर पीटीआयचे समर्थक संतप्त झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातमी अपडेट होत आहे..

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube