Download App

ऐतिहासिक निर्णय! मानाच्या गणपतींनंतर मंडई आणि भाऊरंगारी गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार

Punit Balan हे गणेश मंडळांना अर्थिक सहाय्य करतात. त्यानंतर आज त्यांनी चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Punit Balan decision on Pune Ganesh Visarjan Mirvnuk due to lunar eclipse : पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) विश्वस्त, उत्सवप्रमुख व युवा उद्योजक पुनीत बालन हे गणेश मंडळांना अर्थिक सहाय्य करत असतात. तसेच त्यांनी यावेळी डिजेमुक्त गणेशोत्सव असा संकल्प केला आहे. त्यानंतर आज 31 जुलै 2025 रोजी त्यांनी चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

चंद्रग्रहणामुळे कशी असणार विसर्जन मिरवणूक?

अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्यावतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये सांगण्यात आलं की, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार, दि. 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.37 वाजता खग्रास चंद्रग्रहण सुरु होत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार ग्रहणकाळात देवतांच्या मूर्ती झाकून ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्या वेळेच्या आधी, म्हणजेच दुपारी 12 वाजण्यापूर्वी सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.

‘भगव्या’चा अपमान करणाऱ्यांना देव शिक्षा करेल! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञा कडाडल्या

त्यामुळे यावर्षी पासून अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे दोन्ही मंडळे सायंकाळ नंतर नव्हे, तर मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्या पासून मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्या मागोमाग मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. तसेच सर्व गणेश मंडळांनी आपली विसर्जन मिरवणूक रविवारी (दि.7) दुपारी 12 पूर्वी संपवावी. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय आम्ही दोन्ही मंडळांनी एकमताने घेतले आहेत. असं देखील यावेळी सांगण्यात आलं.

तुरूंगात 9 वर्ष छळ, 17 वर्षांनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता; कोण आहेत कर्नल पुरोहित?

त्याचबरोबर मिरवणुकीसाठी नेमलेली पथकांची संख्या शक्य तितकी कमी ठेवावी. जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही. मागील तीन वर्षांतील अनुभव पाहता पोलीस प्रशासनाने वेळेचे पालन न केल्याने आमच्या मूर्ती वेळेत विसर्जनासाठी न्यायला अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे यंदा आम्ही वेळेपूर्वीच सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण सर्वांनी याला धार्मिक आणि सामाजिक जबाबदारी समजून वेळेच्या आधी विसर्जन मिरवणूक संपवावी. ही नम्र परंतु ठाम अपेक्षा आहे. सर्व मंडळांनी या निर्णयाचे पालन करावे. कुठल्याही विलंबामुळे धार्मिक परंपरेवर गालबोट लागू नये, याची पूर्ण काळजी घ्यावी, असे आम्ही सर्व गणेश मंडळांना कळकळीचे आवाहन करीत आहोत. असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं.

मालेगाव स्फोट निकालावर फडणवीसांची सर्वात छोटी पोस्ट; राजकीय वर्तुळातून काय उमटल्या प्रतिक्रिया?

याविषयी माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेला अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, विश्वास भोर आदी उपस्थित होते.

एक विधान अन् राजकारणातून पत्ता कट! साध्वी प्रज्ञा यांची राजकीय कारकीर्द कशी संपली? A टू Z स्टोरी…

तर यावेळी बोलताना पुनीत बालन म्हणाले, ग्रहणकाळ रविवारी (दि.७) दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी सुरु होत आहे. किमान त्याआधी अर्धा तास सर्व गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती मंदिरात नेणे आवश्यक आहे. याकरिता मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक असून आम्ही मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. सर्व गणेशमंडळांनी देखील याबाबत सहकार्य केल्यास पोलिस आणि प्रशासना यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

हत्तीणीला नांदणी मठातून हलवण्याची शेट्टीचीच मागणी; पत्र व्हायरल होताच राजू शेट्टींचा खुलासा

तसेच अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून संपूर्ण दहा दिवस त्याचे महत्व आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे विसर्जन. यावर्षी अनंत चतुदर्शी (दि.६ सप्टेंबर) च्या दुसऱ्या दिवशी (दि.७ सप्टेंबर) खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणकाळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुपारी १२ पूर्वी मंडळाच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यक्य आहे.

कलाकारांनो सज्ज व्हा! 22 वा Third Eye आशियाई चित्रपट महोत्सव, प्रवेशिका सुरू

मागील तीन वर्षे पोलिसांनी दिलेल्या वेळेस सा.७ वा श्री ची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार असतो पण गेली काही वर्षे पोलिस प्रशासनाने शब्द पाळला नाही. त्या मुळे सायंकाळी मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की यंदा मिरवणूक रविवारी दुपारी १२ पूर्वी संपवावी.

follow us