Download App

कुस्तीपटूसाठी सरसावला ‘पुनीत बालन ग्रुप’,‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्याशी करार

Punit Balan Group : पुण्यातील पुनीत बालन ग्रुप ( Punit Balan Group ) हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. त्यामध्ये सण-उत्सव असो की, खेळ असो त्यांच्याकडून नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते. यावेळी आता पुनीत बालन ग्रुप कुस्तीपटूसाठी सरसावला आहे.

मोठी बातमी : दोन मंत्र्यांचे तर ठरले….. खासदारकीसाठी रिंगणात उतरणार

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यात नुकताच परस्पर सामंजस्य करार झाला असून या करारानुसार पुनीत बालन ग्रुप सिकंदर शेखला ३ वर्षांसाठी ४५ लाख रुपयांची मदत करणार आहे.

“दिल्लीत वजन वापरा, मला भीतीतून मुक्त करा”; तिकीट कापण्यासाठी मुनगंटीवारांचं CM शिंदेंना साकडं

देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ कायमच विविध खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिलेला आहे यापूर्वी देखील अनेक खेळाडूंसोबत करार करून पुनीत बालन ग्रुपच्यावतीने त्यांच्या करिअरसाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. नुकताच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेते ठरलेल्या आणि राज्यभर विविध कुस्ती स्पर्धांमध्ये आपली विजयी घोडदौड कायम असलेला सिकंदर शेखचा यांच्या करिअरसाठीही हातभार लावण्याचा निर्णय पुनीत बालन ग्रुपने घेतला आहे.

..तर मी राजकारणातून संन्यास घेईन; प्रताप ढाकणेंचे आमदार राजळेंना चॅलेंज!

त्यानुसार युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सिकंदर शेख यांनाही खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र केसरी कुस्ती जिकल्यानंतर सिकंदर शेख यांचेक आता हिंद केसरी होण्याचे आणि ऑलम्पिक स्पर्धेत देशासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचे स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नाला पूर्ततेची सोनेरी झालर लावण्यासाठी या सहकार्याचा निश्चित उपयोग होईल.

यावर पुनीत बालन यांनी म्हटले की, सिंकदर शेख यांच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूला ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही आर्थिक आणि इतर सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं त्यांचं हिंद केसरी होण्याचं आणि ऑलम्पिक स्पर्धेतून देशासाठी सुवर्णपदक आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल. या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव देशात आणि जगातही झळकेल आणि हाच ‘पुनीत बालन ग्रुप’साठी मोठा सन्मान ठरेल.

follow us