मोठी बातमी : दोन मंत्र्यांचे तर ठरले….. खासदारकीसाठी रिंगणात उतरणार
मुंबई : लोकभेसाठी लवकरच राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि संदीपान भुमरे यांना लोकसभा लढवण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुनगंटीवार आणि भुमरेंना अशा पद्धतीचे आदेश देण्यात आल्याने उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पडद्यामागील घडामोडींनी वेग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. (Sudhir Mungantiwar & Sandipan Bhumre Name Finalised For Loksabha Election)
महायुतीचं जागावाटप ठरलं? भाजप 31 तर शिवसेना-राष्ट्रवादीसाठी नवा फॉर्म्युला
भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंग्रपूरमधून लोकसभा लढवण्याचे तर, शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरेंना (Sandipan Bhumre) छ.संभाजीनगरमधून लढण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे भुमरे आणि मुनगंटीवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास आता निश्चित मानले जात आहे. लोकसभेसाठी इच्छूक नसून स्वतःचे तिकीट कापले जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे नुकतेच मुनगंटीवार यांनी बोलून दाखवले होते. मात्र, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशामुळे त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले नसल्याचे दिसून येत आहे.
‘या’ उमेदवारांचं तिकीट फायनल?
दोन दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत भाजप बोर्डाच बैठक झाली. या बैठकीत काही आठ उमेदवारांची तिकीटे फायनल करण्यात आली. यामध्ये नागपूरमधून नितीन गडकरी, जालनामधून रावसाहेब दानवे, चंद्रपूरसाठी सुधीर मुनगंटीवार, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, सांगली मतदारसंघातून संजय काका पाटील, भिवंडीतून कपिल पाटील, दिंडोरीसाठी भारती पवार आणि बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहिण प्रितम मुंडे या खासदार आहेत. परंतु, या मतदारसंघात आता पंकजा मुंडेंना तिकीट देण्याची चर्चा भारतीय जनता पार्टीत सुरू आहे. जर पंकजा मुंडेंनाच उमेदवारी मिळाली तर पुढे काय राजकीय घडामोडी घडतात, पंकजा मुंडे बहिणीच्या जागी तिकीट स्वीकारणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
“भाजपात जाण्याची इच्छा नाही, गेलोच तर शरद पवारांना कळवीन”; नाथाभाऊंचं मोठं वक्तव्य
तिकीट कापण्यासाठी मुनगंटीवारांचं CM शिंदेंना साकडं
चंद्रपूरसाठी पक्षाने माझं नाव सुचवलं आहे. मात्र माझं तिकीट कापलं जावं यासाठी मी आग्रही आहे, असे मुनगंटीवार म्हणाले होते. त्यानंतर आता लोकसभा लढवा असे आदेश वरिष्ठ पातळीवर देण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे मुंनगंटीवारांनी त्यांचे तिकीट कापले जावे यासाठी CM शिंदेंना साकडं घातलं आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, ‘खरंतर माझ्या मनात फक्त एकच भीती आहे. संसद नवीन तयार झाली त्याच्या दरवाजाचं लाकूड आम्ही याच भागातून (चंद्रपूर) पाठवलं. फक्त असं होऊ नये की त्या दरवाजातून मला जाण्याची आवश्यकता येईल. हे मात्र भीतीपोटी माझ्यावर भीती आहे. राज्यगीत मी तुमच्या परवानगीने निवडलं. त्यात शेवटचे शब्द आहेत ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.’ हे कुठं आता माझ्यावरच बंधन पडेल का? ही भीती वाटते. परवा मी तुम्हाला म्हटलं की, मला या भीतीतून मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरावं.’ असं विधान मुनगंटीवार यांनी केले आहे.