Download App

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था – वैद्यकीय सेवा

Punit Balan : देशातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ च्या (Shrimant Bhausaheb Rangari

Punit Balan : देशातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ च्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust) दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

ट्रस्टच्या  वतीने करण्यात आलेल्या या सेवेचा हजारो वारकरी मंडळांनी लाभ घेतला असल्याची माहिती पुनीत बालन विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांनी दिली आहे.

यावेळी  पुनीत बालन म्हणाले की, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यात आगमन झालं आहे. दोन्ही पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामी असणार आहे. या पालख्यांचं पुणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केल आहे. वारकऱ्यांमुळे पुणे शहराचे वातावरण भक्तीमय झाले आहे.

पुण्यातील विविध मंडळे, संस्था, संघटना यांच्याकडून वारकऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्यात येत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने दरवर्षी प्रमाणे मंदिरापुढे वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी वारकऱ्यांना भोजन वाढून त्यांची सेवा केली असं  पुनीत बालन म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, यावर्षी देखील , मुंबई येथील लिव्हर ट्रान्स्प्लान्ट स्पेशालिस्ट डॉ. कैलास जवाडे हे  त्यांच्या सहकाऱ्यांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळयासोबत पुणे ते जेजुरीपर्यंत तर तुकोबांच्या पालखीसोबत पुणे ते अकलूजपर्यंत पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा आणि चरण सेवा (मॉलिश) केली जाते. त्यांच्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या माध्यमातून आवश्यक ती औषधे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महाराष्ट्राला पंढरपूरच्या वारीची मोठी परंपरा आहे. दरवर्षी  लाखो वारकरी भक्ती-भावाने पालख्यांसोबत पंढरपूरला श्री विठुरायाच्या दर्शनासाठी पायी जातात.

रोहित क्वालिटी बघ…; शालेय गणवेश दाखवत शिंदेंचं रोहित पवारांना उत्तर

श्री विठ्ठलाच्या रुपातील या वारकऱ्यांची भोजन सेवा आणि त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी औषधं उपलब्ध करुन देण्याची संधी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ला मिळाली, हे आमचं परमभाग्य आहे. असं देखील पुनीत बालन म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज