रोहित क्वालिटी बघ…; शालेय गणवेश दाखवत शिंदेंचं रोहित पवारांना उत्तर
Ekanth Shinde On Rohit Pawar : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी विधिमंडळात बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहे. अनेकजणांनी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले मात्र आमचे सरकार पडले नाही.
तसेच त्यावेळी सरकार पडावे म्हणून अनेक लोकांनी पाण्यात देव ठेवले होते पण सरकार पडलं नाही मात्र सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे पडले असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लावला तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे पुन्हा सरकार येणार आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. फेक नॅरेटिव्हने लोकांना एकदा फसवता येतो आता तुमचा फेक नॅरेटिव्ह चालणार नाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
तर दुसरीकडे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका करत त्यांनी शालेय गणवेश दाखवत रोहित क्वालिटी बघ असा टोला लावला. रोहित पवार यांनी शालेय गणवेशबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात थेट शालेय गणवेश दाखवत रोहित क्वालिटी बघ असा टोला लावला. तसेच लहान मुलांच्या शालेय गणवेश आणि आहारामध्ये काही तडजोड करणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जर कुणीही याबाबत तडजोड करत असेल तर त्यावर कारवाई होणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना (Jayant Patil) खुली ऑफर देत तुम्ही आता नकली वाघांबरोबर आहे तुम्ही आता असली वाघांबरोबर या अशी खुली ऑफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना दिली.
फडणवीस – आदित्य ठाकरेंची विधिमंडळात भेट, लिफ्टवरुन संवाद रंगला अन् …
याच बरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. शिंदे म्हणाले, महायुती सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नवार कठोर पाऊल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी फौज उभी केली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
रवींद्र जडेजाच्या जागी ऑल राऊंडर कोण? ‘या’ तिघांचं क्रिकेटमधलं रेकॉर्डही खणखणीत