Punit Balan : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख असणारा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) प्रसिध्द आध्यात्मिक कथाकार आणि भजन गायिका जया किशोरी (Jaya Kishori) यांनी भेट देऊन बाप्पाची आरती केली. यावेळी युवा उद्योजक आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन (Punit Balan) आणि भाविक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्तांबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर देखील हजेरी लावतात. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची रात्री आठ वाजता आरती असते. तर यावर्षी बाप्पाची रात्रीची आरती प्रामुख्याने आधात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा हस्ते करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.
या निर्णयानुसार, मंगळवारी आध्यात्मिक कथाकार तथा प्रसिद्ध भजन गायिका जया किशोरी यांच्या हस्ते बाप्पाची आरती झाली. तर यावेळी युवा उद्योजक आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी किशोरी यांचे मोदकाची प्रतिकृती देऊन स्वागत केले.
भारताच्या प्रयत्नांना यश, रशिया-युक्रेन युद्धात देखील अर्थव्यवस्था सुपरफास्ट
तसेच जया किशोरी यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपतीच्या आरतीचा मान दिल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानले. आरती कार्यक्रमाआधी ढोल-ताशा पथकाने केलेल्या वादनाचाही जया किशोरी यांनी आनंद घेतला आणि त्या अक्षरशः त्यात दंग होऊन गेल्या होत्या.