Download App

ठाकरे अन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; पोलीस घटनास्थळी दाखल

  • Written By: Last Updated:

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) काल (ता. 18 ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काल रात्री पिंपरी-चिंचवड येथे ठाकरे गटांच्या (Thackeray groups) कार्यकर्त्यांनी मशाली पेटवत शिंदे अन त्यांच्या गटाच्या नेत्यावर आक्रमक शब्दात घोषणाबाजी केली होती. तर आज पुण्यातही ठाकरे अन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा जोरदार राडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पुण्यातही बालगंधर्व येथे ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमानिमित्त ठाकरे गट अन शिंदे गटाचे कार्यकर्ते पुण्यातील नवी पेठ येथील गांजवे चौकात जमले होते. यावेळी हे दोन्ही गट एकमेकांच्या समोर येतात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी ठाकरे गटाकडून शिंदे गटांच्या विरोधात विरोधात घोषणा दिल्या गेल्या. याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत ठाकरे गटाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे वातावरण कमालीचं तणावपूर्ण झालं होतं. दोन्ही गटाचे कार्यकर्ते हमरातुमरीवर आले होते. यावेळी पोलिसांनी लगेचच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.

Ind VS Aus 2nd Test : अक्षर पटेलची एकाकी झुंज, 74 धावा करत सावरला भारताचा डाव 

देशाच्या केंद्रीय मंत्री अमित शहा हे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे पुण्यामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. मात्र, अचानक ही घटना घडल्याने पोलिसांची मात्र, चांगलीच पळापळ झाली.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या मार्गावर थांबवलं. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढून त्यांना येथून जाण्यास सांगितलं आहे. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

 

Tags

follow us