Raiway Fire : ओडीशा राज्यातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यातील दौंड रेल्वे स्थानकावर मोठी घटना घडली. दौंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्ड मधील रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक आग लागलीय.
अचानक आग लागल्याने रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडालीय. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र या आगीत रेल्वेच्या बोगीचे नुकसान झाले आहे.
Raiway Fire : दौंड स्थानकावर रेल्वेच्या बोगीला लागली आग#RaiwayFire #DaundRailway #punenews #Maharashtra pic.twitter.com/9Y8Y4bW0JE
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 17, 2023
कोलकातापासून 250 किलोमीटर आणि ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून 170 किलोमीटर अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहानागा बाजार स्टेशनजवळ रात्री सात वाजता हा भीषण अपघात झाला होता. या घटनेत दोन रेल्वे व्यतिरिक्त एक मालगाडीचाही समावेश होता. बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसचे तीन डबे चक्काचूर होऊन रुळावरून खाली उतरले. तसेच कोरोमंडल एक्सप्रेसचे 13 डबे ज्यामध्ये सामान्य, स्लीपर, एसी 3 टियर आणि एसी 2 टियर डबे समाविष्ट होते.
खळबळजनक! भाजप नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल…