Download App

Raj Thackeray यांचे आवाहन : राजकारणातील चिखल साफ करायला तरुण सरसावले!

  • Written By: Last Updated:

पुणे : दोन महिन्यांपूर्वी पुणे शहरात सहजीवन व्याख्यानमाला संवाद कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकारणातील चिखल साफ करायचा असेल तर… आपल्यातील काहींना त्या चिखलात उतरूनच तो साफ करावाच लागेल, असे सांगत नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सामील होऊन. त्यांच्या कलागुणांचा वापर करून देशाच्या, राज्याच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ५८ जणांनी संस्थेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी यांच्याकडे आपली नावे दिली होती. आज राज ठाकरे यांनी या ५८ जणांची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

दोन महिन्यांपूर्वी नागरिकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी तुम्हाला भेटेल असा शब्द राज ठाकरे यांनी तरुणांना दिला होता. तो शब्द पाळत राज ठाकरे यांनी आज (दि. १२) रोजी सकाळी ५ वाजता मुंबईवरून निघून ९ वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पुणे येथे पोहोचत. सभागृहामध्ये तब्बल दोन तास राजकारणात येण्यासाठी उत्सुक असलेल्या नागरिकांबरोबर संवाद साधला. त्यांच्या मनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली.

रोझरी शिक्षण संस्थेचे विनय अऱ्हानांना ईडीकडून अटक…

राज ठाकरे म्हणाले की, आज कालचे तरुण हे विविध कलागुणांनी निपुण आहेत. त्यांच्या या कौशल्यांचा वापर राजकारणामध्ये झाल्यास. राजकारणाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक होईल.

याप्रसंगी पुण्यातील मनसे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर, सरचिटणीस वसंत मोरे, किशोर शिंदे, पक्षाचे सचिव-प्रवक्ते योगेश खैरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश सातपुते, बाळा शेडगे, पर्वती विभाग अध्यक्ष विक्रांत आमराळे, विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष अमोल शिंदे, जयराज लांडगे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Tags

follow us