रोझरी शिक्षण संस्थेचे विनय अऱ्हानांना ईडीकडून अटक…
पुणे : पुणे कॅम्प (Pune Camp) परिसरातील रोझरी शिक्षण संस्थेचे (Rosary Institute of Education)संचालक विनय अऱ्हाना (Vinay Arhana)यांना 46 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED)अटक करण्यात आली आहे.ईडीने अरान्हा यांना सत्र न्यायाधीश, शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई (Sessions Judge, City Civil and Sessions Court, Bombay)येथे हजर केलं असून न्यायालयाने त्यांना 20 मार्चपर्यंत कोठडी (custody)सुनावली आहे.
आज (दि.11) दुपारी त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ईडीकडून केला जाणार आहे. यापूर्वी ईडीनं पुणे कॅम्पमधील रोझरी शिक्षण संस्थेचे विनय अऱ्हाना यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकले होते.
मी रामभाऊंच्या पाठिशी म्हणत फडणवीसांनी दिला ग्रीन सिग्नल; काँग्रेसलाही पाडले खिंडार
या प्रकरणी कॉसमॉस बँकेचे शिवाजी विठ्ठल काळे यांनी पुण्यात विनय अरान्हा आणि विवेक अँथनी अऱ्हाना यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. एफआयआरमध्ये आरोपींनी मालमत्तेची बनावट कागदपत्रे दाखवून कॉसमॉस बँकेकडून 20.44 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता.
ईडीच्या तपासात समोर आलं आहे की, विनय अऱ्हाना हा रोझरी एज्युकेशन सोसायटीचा प्रमुख व्यक्ती होता आणि त्याने शाळांच्या नूतनीकरण आणि पुनर्विकासासाठी एकूण 46 कोटी रुपयांची 7 कर्ज घेतली होती. मात्र हा पैसा शाळांसाठी वापरण्याऐवजी, त्यानं आपल्या मित्र आणि सहकाऱ्यांसह मेसर्स पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर, शब्बीर पाटणवाला, अश्विन कामत आणि मेसर्स दीप्ती एंटरप्रायझेस यांना 21 कोटी रुपये दिले.
त्यानंतरही ही रक्कम नमूद कारणासाठी वापरली गेली नाही. उलट विनय अऱ्हानांच्या सूचनेनुसार संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात त्यांना परत देण्यात आली. अशाप्रकारे, एकूण कर्ज रकमेपैकी सुमारे 17.66 कोटी रुपये विनय अऱ्हानांनी रोख स्वरूपात काढले आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय खर्चही केले.