मी रामभाऊंच्या पाठिशी म्हणत फडणवीसांनी दिला ग्रीन सिग्नल; काँग्रेसलाही पाडले खिंडार

मी रामभाऊंच्या पाठिशी म्हणत फडणवीसांनी दिला ग्रीन सिग्नल; काँग्रेसलाही पाडले खिंडार

Devendra Fadnavis : सरकारने शेतकऱ्यांसाठी सोलर फीडरची योजना सुरू केली आहे. रामभाऊ यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, राज्यात शंभर टक्के सोलर फीडर असलेले कर्जत जामखेड तुम्ही करून दाखवा. मतदारसंघातील रस्त्यांचा किंवा अन्य काही विकासकामे असोत त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, की मी आ. राम शिंदेंच्या पाठीशी आहे, मी आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळावा व विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल तथा पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे, आ. बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आ. स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते.

वाचा : Devendra Fadnavis : हसन मुश्रीफांवरील कारवाईवर फडणवीसांचे एकाच वाक्यात उत्तर, म्हणाले.. 

यावेळी  काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी राजकीय भूकंप होणार असे ट्विट आ. शिंदे यांनी केले होते. त्यानंतर हा प्रवेश पार पडला.

फडणवीस पुढे म्हणाले, की कर्जत-जामखेड मतदारसंघात ज्या प्रकल्पांचे आज उद्घाटन केले, खरंतर राम शिंदे पालकमंत्री असतानाच हे सगळे प्रकल्प सुरू केले होते. मध्यंतरी सरकार बदलले पण तरीही हे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. आम्हीच उद्घाटनाला यावे, अशी बहुधा इच्छा असेल.

कर्डिलेंचं वजन वाढलं! सुजय विखे खुर्चीवर बसलेच नाहीत, शेजारी सोफ्याच्या हँडलवर टेकले

राज्य सरकारने अर्थसंकल्पात अनेक योजना जाहीर केल्या आहेत. शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्यासाठी अनेक योजना सुरू केल्या जाणार आहेत. सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली आहे. इतकेच नाही तर नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा मागील सरकारने केली मात्र, काहीच दिले नाही. आमच्या सरकारने मात्र साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा केला.

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सोलर फीडर योजना आणणार आहोत. आगामी चार ते पाच वर्षात सगळेच फीडर सोलरवर करण्याचे सरकारचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितले विरोधकांचे राजकारण; म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर..

कर्डिले साहेब द्याल ना कर्ज ?

सरकारने योजना सुरू केल्या पण त्यासाठी पैसा आणणार कुठून असा प्रश्न विरोधक विचारतात. पण, माझे त्यांना सांगणे आहे की पैसा आहे योग्य वापरला तर तो असतोच. पण तोच पैसा भ्रष्टाचारासाठी स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी वापरला तर कमीच पडणार. समृद्धी महामार्गाच्या वेळीही हे लोक मला वेड्यात काढायचे. दहा हजार कोटींचा रोड होऊ शकत नाही तिथे पन्नास हजार कोटींचा काय होणार असे म्हणायचे. पण साडेतीन वर्षात तो मार्ग आम्ही करून दाखवला. शिर्डीपर्यंत उद्घाटन केले आहे. सहा महिन्यात मार्ग पूर्ण करणार आणि जर पैसे कमी पडलेच तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले साहेब बसले आहेतच. द्याल ना आम्हाला कर्ज असे फडणवीस म्हणताच जोरदार हशा पिकला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube