कर्डिलेंचं वजन वाढलं! सुजय विखे खुर्चीवर बसलेच नाहीत, शेजारी सोफ्याच्या हँडलवर टेकले
अहमदगनर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज कर्जत-जामखेडच्या (Karjat-Jamkhed) दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्या दौऱ्याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वागताचे काही पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे फडणवीसांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या फ्लेक्सची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, आता कर्जत येथील फडणवीसांच्या दौऱ्यात भाजपचे खासदार सुजय विखे हे देखील चर्चेत आले. कर्जतच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले सुजय विखे हे खुर्चीवर स्थानापन्न झाले नाहीत, तर ते शिवाजी कर्डिले यांच्या शेजारी सोफ्याच्या हँडलवर टेकलेले दिसले, त्यामुळे नगरच्या राजकारणात चर्चेला ऊत आला आहे.
कर्जतमध्ये भाजपच्या मेळाव्यासाठी भाजप नेते शिवाजी कर्डिले, आ. राम शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, भाजप खा. सुजय विखे, आ. मोनिकाताई राजळे, आ. बबनराव पाचपुते यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, या मेळाव्यात खा. सुजय विखे हे अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्याचं झालं असं की, या कार्यक्रमात खा. विखे हे व्यासपीठावरील खुर्चीवर बसले नाहीत. तर ते शिवाजी कर्डिले हे ज्या सोफ्यावर बसले होते, त्या सोफ्याच्या हॅंडलवर सुजय विखे हे टेकलेले दिसले.
यावेळी बोलतांना फडणवीस यांनी, तर राम शिंदे यांच्या नियोजनाचं कौतुकं केलं. ते म्हणाले, माझ्या समोर जेवढे लोक समोर बसले आहेत, तेवढे लोकं व्यासपीठावर बसले आहेत. मी पाठ फिरवली, तर मला आणखी एक सभा घ्यावी लागेल, इतकी गर्दी शिंदे यांनी या मेळाव्याला जमवली, अशा शब्दात पाठराखण केली. याशिवाय त्यांनी शिवाजी कर्डिले यांचं कौतूक केलं. जिल्हा बॅंकेत कर्डिलेंनी चमत्कार घडवला. कर्डिले हे चमत्कार घडवण्यात करता फेमस आहेत. त्यांच्या टोपीखाली काय काय दडलंय…, अशी शब्दात कर्डिलेंच्या कामाची स्तुती केली.
अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा! मुख्यमंत्र्यांची थेट महाराजांसोबत तुलना
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आपल्या पराभवाला कर्डिले यांनी राधाकृष्ण विखे यांना जबाबदार धरलं होतं. त्यामळे विखे-कर्डिलेंयांच्यात मतभेद निर्माण झाले होते. नंतरच्या काळात विखे-कर्डिले यांच्यातील वाद निवळले होते. त्यानंतर अनेक कार्यक्रमांत सुजय विखे आणि शिवाजी कर्डिले हे एकत्र दिसले. या नेत्यांनी एकमेकांवर जाहीर कार्यक्रमांत कधी चिखलफेक केली नसली तरीही या नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफुस असल्याची चर्चा असते. दरम्यान, नुकतीच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपती कर्डिले यांची निवड झाली. कर्डिले यांनी महाविकास आघाडीच्या हातातील बॅंकेवर ताबा मिळवला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामुळे नगरच्या राजकारणात कर्डिलेंचं वजन वाढल्याची चर्चा आहे. त्यातच फडणवीसांनी केलेली कर्डिलेंची स्तुती यामुळे सुजय विखे यांनी शिवाजी कर्डिले यांना खुर्चीवर बसालया दिलं तर, ते स्वत: खुर्चीवर न बसता कर्डिलेंच्या शेजारी सोफ्याच्या हॅंडलवर बसले होते. यावेळी त्यांच्यात अनेक महत्वांच्या विषयावर चर्चा झाल्याची देखील चर्चा आहे.