अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरा! मुख्यमंत्र्यांची थेट महाराजांसोबत तुलना

अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरा! मुख्यमंत्र्यांची थेट महाराजांसोबत तुलना

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासोबत तुलना केल्याचं पोस्टर मुंबईत लागले आहे. या पोस्टरमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मनसे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरावं, असे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ऐतिहासिक घटनांचे विद्रुपीकरण केलं जात असल्याची टीका केली आहे.

राजू पाटील आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ”कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते,आहेत आणि राहतील. अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरा!”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ऐतिहासिक घटनांचे विद्रुपीकरण केलं जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ”तुलना तर सोडाच… थेट छत्रपती शिवाजी महाराजच… अरे काय चालू काय आहे महाराष्ट्रात. विद्रुपीकरण एका ऐतिहासिक घटनेचं. ते पण इतकं.”

मोदींच्या हुकूमशाही कारभारामुळे देश आर्थिक संकटातून, पटोलेंनी लगावला टोला

गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. वादग्रस्त वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन जावे लागले होते. त्यानंतर आता या पोस्टरवरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

मुंबईत शिवजयंतीनिमित्त एका ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली आहे. तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना दाखवले आहे. त्याचवेळी दुसऱ्या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देताना दाखवले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube