Download App

राज ठाकरेंनी आरे वसंत कुठे आहे रे? म्हणताच वसंत मोरे काही मिनिटातच…

  • Written By: Last Updated:

पुणे : गेल्या वर्षी 28 डिसेंबरला पुण्यातील सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहजीवन व्याख्यानमालेत “नवं काहीतरी” या विषयावर व्याख्यान दिलं होतं. या व्याख्यानमालेत राज यांनी माझ्यासोबत काम करणाऱ्यानी आयोजकांकडे नावं नोंदावी, असे आवाहन केले होते.

त्यांच्या या आवाहनानंतर 58 तरुणांनी आयोजकांकडे नावं नोंदविले होते. याची दखल घेत राज ठाकरे यांनी काल (ता.12 मार्च) अचानकपणे या तरुणांची बैठक घेत या तरुणांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. पुण्यातील पर्वती येथील पंडित भीमसेन सभागृह येथे ही बैठक पार पडली.

या बैठकीला पुण्यातील मनसेचे अनेक नेते उपस्थित होते. मनसे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर, सरचिटणीस वसंत मोरे, किशोर शिंदे, पक्षाचे सचिव – प्रवक्ते योगेश खैरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश सातपुते, बाळा शेडगे, पर्वती विभाग अध्यक्ष विक्रांत आमराळे, विद्यार्थी सेनेचे पुणे शहर अध्यक्ष अमोल शिंदे, जयराज लांडगे, संतोष पाटील आदी मनसेचे पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या बैठकीनंतर मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. कालच्या कार्यक्रमाला मोरे यांनी हजेरी लावली होती. मात्र, मंचावर न जाता सभागृहात शेवटच्या रांगेत मोरे बसले होते. दरम्यान, वसंत मोरे दिसत नसल्याने राज ठाकरेंनी विचारणा केली आणि मोरे हे लगेच राज ठाकरेंच्या मागे मंचावर जाऊन बसले. याबाबत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट

सभागृह निमंत्रितांमुळे फुल भरलेले असल्यामुळे मी सर्व पदाधीकाऱ्यांसह मागे बसलो होतो. कारण कार्यक्रम नागरिकांचा होता त्यामुळे नागरिकांचे प्रश्न येत होते. साहेब त्यांना अपेक्षित उत्तरे देत होते आणि अचानकच साहेबांनी आवाज दिला आरे वसंत कुठे आहे रे ? मी साहेबांच्या मागे बसलो होतो. पुढच्या काही मिनिटात  मी उभा राहिलो पुन्हा एकदा Where is Vasant More ? Here is Vasant More…

राऊतांनी केले राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप, फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी 

नुकताच पार पडलेल्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याला देखील मोरे मंचावर उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नक्की कुठे आहेत?, मोरे पुन्हा पक्षात नाराज आहेत का ? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण देत ‘Here is Vasant More…’ असं म्हंटल होतं. ‘मी ज्या ठिकाणी बसलो होतो त्याठिकाणी माझ्या दोन्ही बाजूला लोक होती. त्यामुळे मला जागेवरून उठता आलं नाही. तोपर्यंत कार्यक्रम सुरु झाला आणि मला उठता आलं नाही. म्हणून मी मंचावर नव्हतो.’ असं स्पष्टीकरण मोरे यांनी दिल होत. दरम्यान, या नंतर मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासोबत सभागृगातील एक फोटो समाज माध्यमांवर पोस्ट करत ‘Here is Vasant More…’ म्हणत नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकला होता.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी पुणे येथील सहजीवन व्याख्यानमाला संवाद कार्यक्रमांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सामील होऊन त्यांच्या कलागुणांचा वापर करून देशाच्या, राज्याच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 58 जणांनी संस्थेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी यांच्याकडे आपली नावे दिली होती. त्यावेळी नागरिकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी तुम्हाला निवांत कधी भेटेल, असा शब्द राज यांनी तरुणांना दिला होता, तो शब्द त्यांनी पाळत काल सकाळी 5 वाजता मुंबईवरून निघून 9 वाजता पुण्यात आले होते.

Oscar Awards 2023 : भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ची ऑस्करवर मोहोर!

यावेळी राज यांनी नागरिकांबरोबर संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले, ‘राजकारणातील चिखल साफ करायचा असेल तर आपल्यातील काहींना त्या चिखलात उतरूनच तो साफ करावा लागेल. आजचे तरुण हे विविध कलागुणांनी निपुण आहेत त्यांच्या या कौशल्यांचा वापर राजकारणामध्ये झाल्यास राजकारणाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक होईल, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

Tags

follow us