Download App

बाळासाहेबांचे विचार म्हणता पण कृतीत काय आणलं? राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Raj Thackeray on Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आदेश देऊन मुंबई, पुण्यासारख्या शहरात अनेक दुकानांवर अमराठी पाट्या दिसत आहेत. यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांचे विचार म्हणता मग अमराठी पाट्यांवर कारवाई का करत नाही, असा सवाल शिंदे (Eknath Shinde) सरकारला केला आहे.

आपले सरकार मराठी आणि हिंदुत्वाबद्दल तोंड वाजवायला आहे. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार पण कोणते बाळासाहेबांचे विचार ह्यांनी घेतले. कोर्टाने सांगूनही सरकारला मराठी पाट्या करता येत नाहीत, मशिदीवरले भोंगे काढायला सांगितले तेही काढता आले नाहीत. नुसतं बोलायचं बाळासाहेबांचे विचार मग आमलात आणा. तसं पाऊल टाकलं पाहिजे, असे राज ठाकरेंनी राज्य सरकारला सुनावले.

ते पुढं म्हणाले की ज्यावेळी आम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा काढला होता त्यावेळी सरसकट लागल्या होत्या. पण आता शासनाचा धाक आहे का? कोर्टाची भिती वाटते की नाही? उद्या पोलिसांची भिती नाही, सरकारची भिती नाही, कोर्टाची भिती नाही, पुढं आपण अराजकतेकडे जाऊ, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवणार? बावनकुळेंनी सांगूनच टाकलं

ललित पाटील प्रकरणानंतर पुण्यात ड्रग्ज रॅकेट समोर आले होते. यावरुन राज ठाकरेंनी राज्य सरकारला सुनावले आहे. ते म्हणाले की फक्त पुण्यातच आहे असे नाही तर संपूर्ण देशभरात पसरले आहे. माझा तर मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर इतका विश्वास आहे की सरकारने पोलिसांना 24 तास मोकळीक द्यावी. सगळे वठणीवर आणून ठेवतील. पण आणायचे नाही. ड्रग्जचा पैसा सगळीकडे वापरला जातोय की काय अशी शंका यावी इथपर्यंत हे सगळं सुरु आहे, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.

‘उद्धव ठाकरेंना सांगताही येईना अन् सहनही होईना’; देसाईंची जळजळीत टीका

पुण्यामध्ये पाषाण भागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर त्यांनी बोलणं टाळले.

Tags

follow us

वेब स्टोरीज