जनता काँग्रेसला का मत देईल? थोरातांच्या बालेकिल्ल्यात बावनकुळेंचे शक्तिप्रदर्शन

जनता काँग्रेसला का मत देईल? थोरातांच्या बालेकिल्ल्यात बावनकुळेंचे शक्तिप्रदर्शन

Chandrasekhar Bawankule : आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे आज बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मतदार संघात आहे. यावेळी काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, या मतदार संघात 51 टक्के मत हे महायुतीच्या उमेदवाराला मिळतील. कारण काँग्रेसचे काही व्हिजनचे नाही आहे. ते त्यांची भूमिका देखील स्पष्ट करत नाही. यामुळे त्यांना कोण मत देतील व का मत देतील असा प्रश्न आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थोरातांच्या बालेकिल्ल्यात येत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात आज मंगळवारी ते नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा क्षेत्राचा दौरा करत आहे. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे. दरम्यान माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात आज बावनकुळे आले आहे. लोकसभेच्या दृष्टीने त्यांच्या या भेटीला मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

Ahmednagar News : नगरमध्ये मोठ्ठा घोटाळा! काँग्रेस नेत्याची थेट नांगरे पाटलांकडे तक्रार

संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, याठिकाणी महायुतीचा कोणाचाही उमेदवार असो त्याला 51 टक्के मत मिळवून देण्याचे काम हे भाजपचे आहे ते आम्ही करणार. तसेच काँग्रेसवर टीका करतां ते म्हणाले, काँग्रेसचे काही व्हिजनचे नाही आहे. ते त्यांची भूमिका देखील स्पष्ट करत नाही. यामुळे त्यांना कोण मत देतील व का मत देतील असा प्रश्न आहे. येत्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघामध्ये शंभर टक्के आमच्या उमेदवारांना काँग्रेसपेक्षा जास्त मत मिळालेली दिसून येतील असा विश्वास यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारला दिलासा, 12 हजार कोटींच्या दंडाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

लोकसभेसाठी मोर्चेबांधणी
शिर्डी लोकसभा सध्या एकनाथ शिंदे गटाच्या ताब्यात आहे. शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे सध्या विद्यमान खासदार आहे. तर येथील जागेसाठी ठाकरे गटाकडून देखील भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच या जागेसाठी आरपीआयचे रामदास आठवले हे देखील इच्छुक असल्याचे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले. दरम्यान हे सगळं सुरु असताना भाजपकडून आता लोकसभांची चाचपणी सुरु आहे. यामुळे बावनकुळे यांचा शिर्डी दौरा हा आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने महत्वाचा ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube